Friday, May 3, 2024
Homeजळगावलग्न कर, नाहीतर ॲसिड फेकेल ; पाचोरा शहरात रोड रोमिओंचा धुमाकूळ

लग्न कर, नाहीतर ॲसिड फेकेल ; पाचोरा शहरात रोड रोमिओंचा धुमाकूळ

पाचोरा – प्रतिनिधी pachora

शहरातील तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा सतत दोन महिन्यांपासून पाठलाग करून तू माझ्याशी लग्न कर नाहीतर तुझ्या अंगावर ॲसिड टाकून देईल अशी धमकी देऊन त्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना पाचोरा तालुक्यात उघडकीस आली आहे.

- Advertisement -

मुलीच्या आईच्या तक्रारी वरून पोलिसात त्या रोडरोमिओं विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. पोलीस सूत्रांच्या प्राप्त माहितीनुसार दि.२७ जुलै २०२३ रोजी दुपार साडेबारा वाजे पावेतो संशयित आरोपी सलीम पिंजारी हा गेल्या दोन महिन्यांपासून शहराच्या एका भागातील एक तेरा वर्षीय अल्पवयीन मुलगी दैनंदिन शाळेत जात असतांना तिचा वेळोवेळी पाठलाग करीत होता. दि.२७ रोजी तो तिच्या शाळे जवळ गेला, तू माझ्याशी लग्न कर आणि माझ्यासोबत चल नाहीतर तुझ्या अंगावर ॲसिड टाकून देईल अशी धमकी देऊन तिच्या मनात लज्जा निर्माण होईल असे कृत्य त्याने केले. म्हणून मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिसात संशयित आरोपी विरुद्ध गु.र.नंबर २७८/२३ भांदवी कलम, ३५४, ५०६ बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम कलम १२ व अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ चे कलमा अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली असून संशयीतास अटक करण्यात आलेली आहे.

या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. तर या घटनेचा पुढील तपास पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल खताळ करीत आहेत.

पाचोरा शहरात रोडरोमिओंचा धुमाकूळ

पाचोरा शहरातील महाविद्यालये आणि शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेस रोडरोमिओं शाळा व कॉलेजच्या प्रवेशद्वारा जवळ किंवा काही ठराविक कट्ट्यावर भररस्त्यात दुचाकी वाहने घेऊन शाळा-कॉलेज कडे किंवा घराकडे जाणाऱ्या मुलींचा पाठलाग करीत असल्याचा प्रकार शहरात वाढला असून अल्पवयीन शाळकरी आणि महाविद्यालयीन तरुणींमध्ये भीतीचे वातावरण आहे

पोलिसांनी रोडरोमिओंचा बंदोबस्त करावा

या प्रकारांकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत असून पोलिसांनी तक्रारींची वाट न पाहता शहरात धुमाकूळ घालणाऱ्या रोडरोमिओंचा वेळीच बंदोबस्त न केल्यास भविष्यात याचे विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी भीती तरुणी आणि पालकवर्गात निर्माण झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या