Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजनाशिक कुंभमेळ्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद नाही- राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी वेधले लक्ष

नाशिक कुंभमेळ्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद नाही- राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी वेधले लक्ष

मुंबई । प्रतिनिधी

नाशिक येथे दर १२ वर्षांनी भरणारा सिंहस्थ कुंभमेळा दोन वर्षावर आला असून या कुंभमेळ्याच्या तयारीसाठी राज्य अर्थसंकल्पात भरीव तरतूद करायला हवी होती. तुम्ही ऐनवेळी निधी देणार, मग कामे गुणवत्तेची कशी काय होणार, असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार छगन भुजबळ यांनी मंगळवारी विधानसभेत अर्थसंकल्पावर अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली.

- Advertisement -

आज विधानसभेत सन २०२५-२६ या वर्षाच्या अर्थसंकल्पावर सर्वसाधारण चर्चा झाली. या चर्चेत सहभागी होताना भुजबळ यांनी नाशिक सिंहस्थ मेळ्याचा मुद्दा उपस्थित केला. नाशिकच्या कुंभमेळ्याच्या तयारीला सरकारने लागले पाहिजे. निधीला विलंब झाला तर कामे गडबडीत होतात. मागच्या कुंभमेळ्यास राज्य सरकारने पैसे वेळेत दिले हाेते. त्यामुळे कामे उत्तम झाली होती. या अर्थसंकल्पात कुंभमेळ्यासाठी निधीची तरतूद असेल असे वाटले होते. प्रयागराज इतके पैसे नाशिकला मिळणार नसले तरी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातले तर केंद्र चांगली मदत करेल, असे भुजबळ म्हणाले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्राच्या वाट्याला ११० टीएमसी पाणी आले आहे. यापैकी ११ टीएमसी पाणी आजपर्यंत आपण अडवू शकलो आहोत. आजही ९९ टीएमसी पाणी इतर राज्यात वाहून जाते आहे. पाणी अडवण्याकडे सरकारने गांभीर्याने पाहिले पाहिजे. अन्यथा मराठवाड्यातील दुष्काळ आपण हटवू शकणार नाही. त्यासाठी जलसंपदा विभागाला अधिक निधी दिला पाहिजे. या विभागाची कामे प्राधान्याने करा अन्यथा पाण्यासाठीची भांडणे थांबणार नाहीत, असा सल्ला भुजबळ यांनी दिला.

देशाच्या सरासरीच्या तुलनेत राज्यात अंडी आणि दूधाची उपलब्धता कमी आहे. कृषी क्षेत्रातली आपली पिछेहाट खेदजनक आहे. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे पैसे अडलेले आहेत. ‘शिक्षण हक्क कायद्यानुसार’ दुर्बल घटकातील २५ टक्के विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्काचे शिक्षण संस्थांचे शेकडो कोटी दिलेले नाहीत.वसतीगृहांचे भोजनाचे पैसे महिनोनमहिने मिळत नाहीत, याकडे भुजबळ यांनी लक्ष वेधले. शिवभोजन थाळी योजना बंद करण्याचा सरकारचा विचार असला तरी तसा निर्णय घेऊ नये, अशी विनंती छगन भुजबळ यांनी यावेळी राज्य सरकारला केली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...