नाशिक । प्रतिनिधी Nashik
जीवन संजीवन सारख्या पुरस्कारामुळे समाजाला डॉक्टरांबद्दल एक चांगला संदेश मिळतो. डॉक्टरांचे उत्तम कार्य समाजापुढे मांडण्याची काम दैनिक ’देशदूत’ने केले याबद्दल दै.’देशदूत’चे अभिनंदन. समजाने डॉक्टरांबद्दलची नकारात्मकता बाजूला ठेवून त्यांच्यावर विश्वास ठेवणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर प.वि.से.प., अ.वि.से.प., वि.से.प. (नि.) यांनी काढले. दैनिक ‘देशदूत’ आयोजित ’जीवन संजीवन पुरस्कार 2024’ वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. नाशिक-पुणे रोडवरील नाशिक्लब येथे कार्यक्रम उत्साहात पार पडला.
अनेक नामवंत डॉक्टर सेवाभावी वृत्तीने वैद्यकीय सेवाकार्य करीत आहेत. त्यांच्या सेवाकार्याचा गौरव करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी ’डॉक्टर्स दिना’चे औचित्य साधून ’जीवन संजीवन पुरस्कार’ सोहळा आयोजित करण्यात आला होता. या अंतर्गत 5 विविध तज्ज्ञ डॉक्टरांना ’देशदूत जीवन गौरव’ तर 8 विविध क्षेत्रातील डॉक्टरांना ‘जीवन संजीवन पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी विशेष अतिथी म्हणून मुंबईच्या टाटा मेमोरियल कॅन्सर सेंटरचे उपसंचालक ऑन्कोसर्जन डॉ. शैलेश शीखंडे, इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक अध्यक्ष पॅथॉलॉजिस्ट डॉ. सुधीर संकलेचा तसेच ‘देशदूत’ वृत्तपत्र समूहाचे संचालक विक्रम सारडा, संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले, जाहिरात महाव्यवस्थापक अमोल घावरे उपस्थित होते.
डॉ. माधुरी कानिटकर म्हणाल्या, महाराष्ट्र हे पुढाकार घेणारे राज्य आहे, त्यामुळे आरोग्य विज्ञान विद्यापीठ देखील पुढाकार घेऊन वैद्यकीय शिक्षणात चांगले बदल करू पाहत आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने रिसर्च फॉर पब्लिक सारखे चांगले उपक्रम राबवण्यास सुरुवात केले आहे याअंतर्गत 18 खेड्यांमध्ये जाऊन तेथील आदिवासी समाजातील लोकांची काळजी घेणे, विद्यार्थ्यांना त्यानुसार शिक्षण देणे, याची जबाबदारी विद्यापीठाने घेतली आहे. सुरुवातीला डॉ. वैशाली बालाजीवाले यांनी प्रास्ताविक केले.
याप्रसंगी बोलताना डॉ. शैलेश शीखंडे म्हणाले, डॉक्टर रुग्णाचे नाते चांगले असावे यासाठी दोघांनी योगदान देणे गरजेचे आहे. या व्यवसायात येताना डॉक्टरांनी मूल्य व तत्व जपली तर त्याचा फायदा डॉक्टर व रुग्ण दोघांनाही होऊ शकतो.
डॉ. सुधीर संकलेचा म्हणाले, दै. ‘देशदूत’ ने कायमच सामाजिक भान ठेवले आहे. आज झालेल्या सन्मानाने डॉक्टरांना अधिकाधिक चांगले काम करण्याची ऊर्जा मिळेल. आरोग्य व्यवस्थेत आज अमुलाग्र बदल झाले आहे. तत्कालीन शिक्षण व आजचे शिक्षण यात फरक असून रुग्णांची गरज ओळखून वैद्यकीय शिक्षण सध्या भावी डॉक्टरांना दिले जात आहे. डॉक्टर व रुग्णांचा सुसंवाद कायम राहायला हवा असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी बस्तीराम सारडा व्याख्यानमालेच्या आठवणींना देखील उजाळा दिला.
सर्व पुरस्कारार्थींच्या वतीने सन्मानाला उत्तर देताना डॉ. शिरीष सुळे म्हणाले, आज पर्यंत चांगले कार्य हातून घडले आहे त्यामुळे दै. ‘देशदूत’ने जो सन्मान दिला त्याचा अभिमान वाटत आहे. यापुढे देखील उत्तम उत्तम कार्य करत राहू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या शेवटी जाहिरात महाव्यवस्थापक अमोल घावरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. याप्रसंगी भाजपचे लक्ष्मण सावजी, क्रेडाई नाशिक अध्यक्ष कृनाल पाटील, दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संचालक दीपक चंदे, क्रेडाई मानद सचिव गौरव ठक्कर, नावाचे अध्यक्ष प्रवीण चांडक, सचिन गीते, विठ्ठल राजोळे, महेश कलंत्री, अमोल कुलकर्णी, अनिल अग्निहोत्री, दीपक जगताप, गणेश नाफडे, डॉ. अभिजित चांदे, धनंजय मोहाडकर, जितेंद्र येवले, जाहिरात व्यवस्थापक मिलिंद वैद्य, ग्रामीण जाहिरात व्यवस्थापक सचिन कापडणी, कॉर्पोरेट व्यवस्थापक संदीप राऊत, मार्केटिंग ऑफिसर समीर पराशरे, भगवान जाधव, आनंद कदम, आदी उपस्थित होते.
‘देशदूत’ जीवनगौरव पुरस्कारार्थी
देशदूत जीवन गौरव पुरस्कार
डॉ. शिरीष सुळे
डॉ. अनिल कासलीवाल
डॉ. शिरीष देशपांडे
डॉ. विकास गोगटे
डॉ. रवींद्र शिवदे
देशदूत जीवन संजीवन पुरस्कारार्थी
डॉ. गजीराम पवार
डॉ. नारायण देवगावकर
डॉ. प्रशांत बिर्ला
डॉ. राजेंद्र नेहेते
डॉ. विनोद महाले
डॉ. खुशाल जाधव
डॉ. विशाल रायते पाटील
सद्गुरू हॉस्पिटल, पंचवटी नाशिक