Tuesday, April 29, 2025
Homeधुळेदेवपूराला जोडणारा नवीन पुल होणार

देवपूराला जोडणारा नवीन पुल होणार

धुळे : dhule

शहरातील देवपूराला जोडणारा ब्रिटिशकालीन मुख्य पुल (main bridge) हा सध्यास्थितीत वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. हा पुल 110 वर्ष जुना असून त्याचे दगडी बांधकाम आहे. हा पुल नवीन व्हावा, यासाठी संसदरत्न खा. डॉ. सुभाष भामरे (MP Dr. Subhash Bhamre) यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (Minister of Public Works) रविंद्र चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले असून या पूलासाठी 9 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

- Advertisement -

या कारणांसाठी वर्षा घुगरींच्या विरोधात अभियंते एकवटलेआयुक्तपदी डॉ. गायकवाड की पवार : आज मॅटमध्ये सुनावणी

खा. डॉ. सुभाष भामरे यांनी डिसेंबर 2022 मध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पीय पुरवणी यादीत राज्य मार्ग, इतर जिल्हा मार्ग बिगर आदिवासी क्षेत्रातील कामांसाठी धुळे लोकसभा मतदार संघातील धुळे शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा धुळे व देवपूरला जोडणारा जुना मुंबई-आग्रा रस्ता रा.मा-15 अ कि. मी. 20/400 वरील पांझरा नदीवर जुन्या ब्रिटिशकालीन पुलाच्या ठिकाणी नवीन मोठ्या पुलाचे जोड रस्त्यासह बांधकाम करण्याबाबत 14 कोटी रुपयांची मागणी केली होती. या पुलाची डागडुजी न करता नवीन पूलासाठी डिसेंबर

VISUAL STORY : स्व़. सुशांतसिंहच्या EX- गर्ल फ्रेंड चा हा लुक करेल तुम्हालाही घायाळ

अर्थसंकल्पीय पुरवणी यादीत 9 कोटी रुपये मंजूर केले आहेत. यामुळे खा डॉ. सुभाष भामरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे आभार मानले आहेत.

VISUAL STORY : ब्रायडल वेशभुषेतील चंदना कोणाची वाट पाहतोय बरे…

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

हॅक

IndiaVsPakistan: तणावपुर्ण वातावरणातही पाकिस्तानच्या कुरापती सुरुच; भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. सततच्या दहशतवादी कारवायांमुळे या सर्वांच्या मागे...