Saturday, May 4, 2024
Homeनाशिकदेवळालीसाठी उपजिल्हा रुग्णालय होणार : आ.अहिरे

देवळालीसाठी उपजिल्हा रुग्णालय होणार : आ.अहिरे

देवळाली कॅम्प । वार्ताहर Devlali Camp

देवळाली विधानसभा मतदारसंघातील देवळाली,भगूरसह परिसरातील सुमारे 50 खेड्यांतील नागरिकांना चांगली आरोग्यसेवा मिळण्यासाठी भगूर परिसरात 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर करावे, यासाठी आ.सरोज अहिरे यांनी आरोग्यमंत्री डॉ.राजेश टोपे याच्याकडे आग्रही मागणी केली.

- Advertisement -

याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याने मतदार संघासाठी महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.देवळाली मतदार संघातील भगूर, देवळाली कॅम्प या दोन शहरांसह 66 खेड्यांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत 9 उपकेंद्रे असून मोठ्या शहरात एकही केंद्र नाही. जी उपकेंद्रे आहेत त्या ठिकाणी प्राथमिक उपचार व प्रसूतीच्या सुविधाव्यतिरिक्त इतर सुविधांचा अभाव आहे.

त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागतो. शहरी भागातील हॉस्पिटलमध्ये असलेले दर परवडणारे नसल्याने होणारी अडचण दिवसेंदिवस वाढतच आहे. ही बाब लक्षात घेऊन आ. अहिरे यांनी जानेवारीमध्ये आरोग्यमंत्र्यांना पत्र देऊन भगूर-देवळाली येथे 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर व्हावे, अशी मागणी केली होती.

याबाबत डॉ.टोपे यांनी मंजुरीस्तव प्रस्ताव सादर करण्याचा दिलेला अभिप्राय आरोग्य आयुक्तालयास प्राप्त झाला असून सदर पत्रानुसार देवळाली-भगूर येथे 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालयाबाबत परिपूर्ण प्रस्ताव तयार करून तो आरोग्यमंत्र्यांना सादर करण्यात येणार आहे. सदर प्रस्ताव तातडीने तयार व्हावा, या मागणीसाठी आ.अहिरे यांनी काल आरोग्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी डॉ.टोपे यांनी लवकरच हा प्रश्न मार्गी लावू असे सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या