Tuesday, September 24, 2024
Homeमुख्य बातम्याचार हजार किलो भगर बनवण्याचा होणार जागतिक विक्रम

चार हजार किलो भगर बनवण्याचा होणार जागतिक विक्रम

नाशिक । प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

प्रख्यात सेफ विष्णू मनोहर (Famous Safe Vishnu Manohar )हे नाशिकमध्ये आपला 16 जागतिक विक्रम(World Record ) करणार असून, दि 12 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र मिलेट्स मिशन(Maharashtra Millets Mission ), नाशिक भगर मिल असोसिएशन( Nashik Bhagar Mill Association) यांच्या सहकार्याने तब्बल 4 हजार किलो भगर बनवून नाशिककरांना खाऊ घालणार आहेत.

आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड्स मधील मिलेट्स प्रकारातील हे एकमेव रेकॉर्ड होणार असून, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्ससह विविध ठिकाणी याची नोंद घेतली जाणार असल्याची माहिती सेफ विष्णू मनोहर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी नाशिक भगर मिल असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र छोरीया , उमेश वैश्य, अशोक साखला, पारस साखला उपस्थित होते.

युनेस्को ने 2023 हे वर्ष मिलेट्स (तृणधान्य) वर्ष म्हणून नुकतेच जाहीर केले आहे. भारत तृणधान्य उत्पादनात आघाडीवर आहे. तृणधान्यमधील जीवनसत्व , शुद्धता आणि धान उत्पादकांचा फायदा नजरेसमोर ठेवून भारत अनेक उपक्रमातून याचा प्रचार प्रसार करणार आहे. नाशिकची भगर भारतात प्रसिद्ध आहे. तिचा अधिक प्रसार व्हावा म्हणून नाशिक भगर मिल असोसिएशनने पुढाकार घेऊन महाराष्ट्र मिलेट्स मिशन यांच्या सहकार्याने प्रख्यात सेफ विष्णू मनोहर यांच्या या कार्यक्रमाचे नियोजन केले असलयाचे महेंद्र छोरीया यांनी सांगितले.

भगरची खास रेसिपी

भगर बनविण्यासाठी विष्णू मनोहर यांनी खास रेसिपी तयार केली असून, त्यासाठी भगर 400 किलो ,बटाटा 250 किलो, मीठ 37 किलो, तेल,125 किलो, पाणी 2700 लिटर , जिरा 12 किलो, शेंगदाणे 100 किलो , शेंगदाणे कूट 125 किलो, दही 400 किलो, 50किलो, तूप 100 किलो, दूध 100 लिटर हे साहित्य वापरून 4 हजार किलो भगर तयार होणार आहे.

जागतिक विक्रम

एकाच वेळी 4 हजार किलो पेक्षा जास्त भगर एकाच कढईत शिजवून लोकांना मोफत वाटण्यात येणार आहे. हे तृणधान्य प्रकारातील जागतिक रेकॉर्ड होणार आहे. सेफ विष्णू मनोहर यांनी आतापर्यंत विविध पंधरा रेकॉर्ड केले असून, नाशिक मधील हे त्यांचे 16 वे जागतिक रेकॉर्ड असणार आहे. याची नोंद अनेक रेकॉर्ड्स बुक्स मध्ये केली जाणार आहे. चार हजार किलो भगर एकाचवेळी शिजवण्यासाठी नागपूर येथे खास कढई तयार करण्यात आली आहे. त्या कढईचे वजन सुमारे दीड हजार किलो असून, 10 बाय 10 फूट व्यास आणि 5 फूट उंच आहे. त्यासाठी 3 प्रकारचे 22 किलो वजनाचे मोठे चमचे ही तयार करण्यात आले आहेत. रविवारी (दि.12) सकाळी 8 वा भगर शिजवण्याच्या या उपक्रमास प्रारंभ करण्यात येईल.तर 11वाजेपर्यंत भगर तयार होईल. यांनतर ती नागरिकांना मोफत वाटण्यात येणार आहे. काही भगर नाशिकमधील अनाथालये , वृद्धाश्रम आदी ठिकाणी देण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या