Saturday, July 27, 2024
Homeनाशिकजि.प. पदभरती आता या संवर्गांची होणार परीक्षा

जि.प. पदभरती आता या संवर्गांची होणार परीक्षा

नाशिक | प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या वतीने विविध संवर्गांसाठी पदभरती करण्यात येत आहे. आता कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ अभियंता (विद्युत), वायरमन, फिटर व पशुधन पर्यवेक्षक या ६ संवर्गातील पदांसाठी आयबीपीएस कंपनीच्या वतीने विविध परीक्षा केंद्रांवर १५ व १७ ऑक्टोबर रोजी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाणार आहे.

- Advertisement -

यासंदर्भातील जिल्हा परिषद पदभरतीचे वेळापत्रक व परीक्षा केंद्र यासाठीचे प्रकटन हे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सदस्य जिल्हा निवड समिती आशिमा मित्तल यांच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आले असून, नाशिक जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर हे प्रकटन उपलब्ध करून देण्यात आले आहे.

सर्व परीक्षार्थींनी याबाबत नोंद घ्यावी असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. हॉलतिकीट डाऊनलोड कुठून करावे – जिल्हा परिषद पदभरतीतील ६ संवर्गाच्या परीक्षा या १५ व १७ ऑक्टोबर रोजी होणार असून आयबिपीएस कंपनीच्य संकेतस्थळावरून विद्यार्थांना हॉल तिकीट उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थ्यांनी रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबर व ईमेल आयडीवर देखील हॉल तिकीटची लिंक पाठवण्यात आलेली आहे.

कुठल्या पदासाठी कधी होणार परीक्षा –

दि.१५ ऑक्टोबर

1) कनिष्ठ लेखाधिकारी -१०१ परीक्षार्थी,

2) कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) – ९८ परीक्षार्थी

3) कनिष्ठ अभियंता (विद्युत) – ६५ परीक्षार्थी

दि.१७ ऑक्टोबर –

1) वायरमन – ३७ परीक्षार्थी

2) फिटर – ६ परीक्षार्थी

3) पशुधन पर्यवेक्षक – ७४७ परीक्षार्थीॉ

- Advertisment -

ताज्या बातम्या