Friday, November 22, 2024
Homeनाशिकनाशकात महागणेशाेत्सव; ७५० सार्वजनिक मंडळांकडून नाेंदणी

नाशकात महागणेशाेत्सव; ७५० सार्वजनिक मंडळांकडून नाेंदणी

शहर जिल्ह्यात ७ हजार पाेलीस तैनात

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

लाडके गणराया आज (दि.७) रोजी सर्वत्र विराजमान होत आहे. शहर आणि जिल्ह्यातील (Nashik City and District) लाखो भाविकांनी घरात तर शहरात सुमारे ७५० सार्वजनिक मंडळांनी गणरायाची (Ganpati) स्थापना करण्यासाठी तयारी पूर्ण केली आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात व भाविक देखावे पाहण्यासाठी गर्दी करणार असल्याने शहर पाेलिसांनी एकूण बंदोबस्तासह, वाहतूक नियोजन व वाहनतळाचे नियोजने केले आहे.

- Advertisement -

शहरात सुमारे साडेतीन हजार पोलिसांचा (Police) फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.गणेशोत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी नियोजन केले आहे. शहरात पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या तर ग्रामीण अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्तासह वाहतूकीचे नियोजन केले आहे. मोठ्या मंडळांसह मौल्यवान गणपती मंडळांजवळ पाेलिसांचा फौजफाटा राहणार असून सीसीटीव्हीवरही भिस्त ठेवण्यात आली आहे. तसेच गर्दीत भुरट्या चोरांना रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे.

हे देखील वाचा : पुन्हा हिट अँड रन! गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांना भरधाव कारनं चिरडलं

महिलांची (Women) छेडछाड रोखण्यासाठी निर्भया, दामिनी पथकांची गर्दीच्या ठिकाणी सतत गस्त राहणार आहे. शहर व ग्रामीण पोलिसांनी मिळून सुमारे ६ हजार पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात केला आहे. तसेच राज्य राखीव दल, होमगार्डचाही बंदोबस्त राहणार आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही कोणत्याही मंडळास डीजेला परवानगी नसेल. शिवाय लेझर लाइट बसविण्यावरही पोलिसांनी निर्बंध लादले आहेत. मंडळांनीही स्वयंस्फूर्तीने लेझर लाईटचा वापर टाळण्याचे ठरवले आहे.

गणेशोत्सवानिमित्त शहरातील वाहनतळ

गोल्फ क्लब मैदान, डोंगरे वसतिगृह मैदान (जुना गंगापुर नाका), गौरी पटांगण, पंचवटी, म्हसोबा पटांगण, पंचवटी, तपोवन, निलगीरी बाग छ. संभाजीनगर रोड, संभाजी स्टेडीयम, सिडको, पवननगर मैदान, सिडको, मराठा हायस्कुल गंगापुर रोड,  शरदचंद्र पवार मार्केट, पेठ रोड, कवडे गार्डन गंगापुर रोड

हे देखील वाचा : गणपती बाप्पा मोरया! ढोल-ताशांच्या गजरात घरोघरी लाडक्या बाप्पाचं आगमन, पाहा VIDEO

इतके पोलिस ऑनफिल्ड

पाेलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली ४ पोलिस उपायुक्त, सात सहायक आयुक्त, पाेलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक २००, सुमारे ३ हजार पोलिस अंमलदार, १४०० हाेमगार्ड, ३ एसआरपी प्लाटून, क्युआरटी २, आरसीपी २, बीडीडीएस -१, नवप्रविष्ट ७२ पाेलीस, दामीनी, निर्भया माेबाईल

ग्रामीण पोलिसांचा बंदाेबस्त

२ अतिरीक्त पोलिस अधीक्षक, ८ उपविभागीय अधिकारी, ४० प्रभारी निरीक्षक, सुमारे ३ हजार पोलिस अंमलदार, १ हजार ५५० होमगार्ड, आरसीपीच्या ६ तुकड्या, एसआरपीएफची १ कंपनी, २ उपविभागीय व १६ प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षकही बंदोबस्तात सहभागी राहणार आहेत.

ग्रामीणमध्ये ८०४ गावांमध्ये ‘एक गाव एक गणपती’

ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत दरवर्षी प्रमाणे यंदाही ८०४ गावांनी सामुहिक निर्णय घेत एक गाव एक गणपती बसवण्याचा निर्णय घेतला आहे. तर ५८८ मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळे व १ हजार १७१ लहान मंडळांनी गणपती बसवण्यासाठी पोलिसांकडे अर्ज केले आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या