Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रRain Alert : राज्यासाठी पुढील चार दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस...

Rain Alert : राज्यासाठी पुढील चार दिवस महत्त्वाचे; ‘या’ जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस बरसणार, IMD कडून अलर्ट जारी

मुंबई | Mumbai

राज्यात ऑगस्ट महिन्यात (Month of August) दडी मारून बसलेला पाऊस (Rain) सप्टेंबरमध्ये पुन्हा सक्रिय झाला आहे. दोन आठवड्यापूर्वी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये (Districts) पावसाने तुफान हजेरी लावली होती. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळाला होता. तसेच बळीराजा देखील सुखावला होता. अशातच आता पुन्हा एकदा येत्या चार ते पाच दिवसात राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

- Advertisement -

Nashik Accident News : कार-कंटेनरचा भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

हवामान विभागाने (Meteorological Department) दिलेल्या माहितीनुसार, आज म्हणजेच सोमवारी राज्यातील पुणे, मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता आहे. तर इतर सर्व जिल्ह्यांना ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे. तसेच या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर राज्याच्या पूर्व भागात पावसाचे प्रमाण अधिक राहणार असून मुंबईसह कोकणात धुव्वाधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Trimbakeshwar News : त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट झाले मालामाल; दोन महिन्यात मिळाले ‘इतक्या’ कोटींचे उत्पन्न

दरम्यान, राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर वाढल्याने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. याशिवाय धरणांमधील पाणीसाठा (Water Storage in Dams) देखील वाढण्यास सुरुवात झाली आहे. तर नाशिक जिल्ह्यात (Nashik District) देखील पाऊस सुरु असल्याने जिल्ह्यांमधील धरणे बऱ्यापैकी भरले आहेत. त्यामुळे नाशिक शहरासह जिल्ह्यातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Manipur : खळबळजनक! मणिपूरमध्ये जवानाचे अपहरण करून निर्घूण हत्या

- Advertisment -

ताज्या बातम्या