Saturday, April 26, 2025
Homeभविष्यवेधडोळ्यांचे हे रंग सांगतात मनुष्याचा स्वभाव..

डोळ्यांचे हे रंग सांगतात मनुष्याचा स्वभाव..

असं म्हणतात, की डोळे खूप काही बोलून जातात. अनेकदा जे शब्दांनी बोलता येत नाही, ते डोळे सांगून जातात. तुमचा यावर कदाचित विश्वासही बसणार नाही, पण हे खरंय. डोळ्यांचा रंग व्यक्तिमत्त्वातील बरेच गुण अगदी सहजपणे सांगतो.

काळे डोळे- डोळ्यांचा रंग काळा असेल, तर अशी मंडळी काहीशी रहस्यमयी असतात. अनेकदा त्यांना पूर्वाभास होतात. त्यांच्यावर तुम्ही अगदी सहज विश्वास ठेवू शकता. एखादी गोष्ट गुपित ठेवण्यासाठी अशी मंडळी उत्तम.

हलके घारे डोळे- अशा व्यक्तींमध्ये जन्मत:च नेतृत्त्वंक्षमता असते. ही माणसं प्रचंड हुशार असतात. पण, काही प्रसंगी इतरांसमोर आपलं मत मांडण्यात त्यांना अडचण येते.

गडद घारे डोळे- ज्यांचे डोळे गडद घारे असतात, ते काहीसे मितभाषी असतात. अशी माणसं एकांतात राहणं पसंत करतात.

निळे डोळे-
यांचं अंतर्मन कणखर असतं, पण इतरांसाठी मात्र ते अहंकारी किंवा भीत्रे असतात. अशा व्यक्ती सहजासहजी कोणाकडे व्यक्त होत नाहीत.

गडद निळे डोळे- अशी माणसं बर्‍याच अंशी संवेदनशील असतात. त्यांची शारीरिक सुदृढताही लक्ष वेधणारी असते.

राखाडी रंगाचे डोळे- ही माणसं कायम दुसर्‍यांचाच विचार आणि त्यांची चिंता करत असतात. यांच्याकडे जीवनात समतोल राखण्याची कला असते.

हिरवे डोळे- फार कमी पण, लक्षवेधी अशा प्रकारात मोडणारा हा डोळ्यांचा रंग. ही माणसं कायम सतर्क असतात. बुद्धीमान असण्यासोबतच ते जिज्ञासूही असतात.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

PM Shahbaz Sharif : “भारताने जर आमचं पाणी रोखलं तर…”; पाकिस्तानचे...

0
नवी दिल्ली | New Delhi | वृत्तसंस्था पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारताने (India) कठोर भूमिका घेत पाकिस्तानसोबत असलेला सिंधू पाणी करार (Indus Water...