मुंबई | Mumbai
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीस प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपस्थित नव्हते. मात्र, दोघांनीही ऑनलाईन बैठकीला हजेरी लावली होती.
हे देखील वाचा : जयदीप आपटेला अटक केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “या प्रकरणात…”
आजच्या बैठकीत घेण्यात आलेले महत्त्वाचे निर्णय पुढीलप्रमाणे…
(सार्वजनिक बांधकाम)
सध्याच्या पुणे- छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा करणार
(पशुसंवर्धन विभाग)
अमरावती जिल्ह्यात नवीन मत्स्य विज्ञान महाविद्यालयासाठी जागा देणार
(वस्त्रोद्योग विभाग)
शेवगाव तालुक्यातील सहकारी सूतगिरणीस अर्थसहाय्य
(कृषी विभाग)
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारले. विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठी भरीव अनुदान
हे देखील वाचा : Rahul Gandhi : “माफी तोच मागतो, जो चुकीचे काम करतो”; राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना टोला
(महिला व बालविकास)
अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा संच देणार. ३६ हजारापेक्षा जास्त केंद्रे प्रकाशमान होणार
(कामगार विभाग)
औद्योगिक कामगार न्यायालयातल्या न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित भत्ते
(पशुसंवर्धन विभाग)
थकबाकी देणाऱ्या कुक्कुटपालन संस्थांना दंडनीय व्याजाची रक्कम माफ.
(जलसंपदा विभाग)
धारूर तालुक्यातील सुकळी गावाचे विशेष भाग म्हणून पुनर्वसन करणार
(विधी व न्याय विभाग)
काटोल, आर्वी, येथे वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश न्यायालय
पैठण, गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त न्यायालय
हिंगोली स्वतंत्र न्यायिक जिल्हा
हे देखील वाचा : तापाने दोन मुले हिरावली, आई-वडिलांनी १५ किमीची पायपीट करत मृतदेह खांद्यावर घेत गाठले घर
इतर
(मदत व पुनर्वसन)
लाडकी बहिणी योजनेमुळे अन्य कोणत्याही योजना बंद होणार नाहीत.
शेतकरी कुटुंबांना मदत बंद केल्याचे वृत्त चुकीचे
(कृषी विभाग)
राज्यात १२१ टक्के पेरण्या
(जलसंपदा विभाग)
राज्यातील मोठी धरणे २०१८ नंतर प्रथमच शंभर टक्के भरली
(महिला व बालकल्याण)
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: सुमारे १ कोटी ६० लाख भगिनींना ४७८७ कोटींचे वाटप
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा