Sunday, June 23, 2024
Homeनगरचोरीच्या उद्देशाने फिरणारे चौघे पकडले

चोरीच्या उद्देशाने फिरणारे चौघे पकडले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

नगर तालुका पोलीस ठाणे हद्दीत रात्रीच्यावेळी चोरीच्या उद्देशाने संशयितरित्या फिरणार्‍या चौघांना गस्ती पथकाने पकडले. त्यांच्याकडून दुचाकीसह चाकू, चॉपर, गलोर जप्त करण्यात आली आहे. त्यांच्याविरूध्द नगर तालुका पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शनिवारी (दि. 17) रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास नगर- जामखेड रोडवर दश्मीगव्हाण शिवारात संकेत सुभाष चाठे (वय 27) व काळुराम चंदू माळी (वय 25 दोघे रा. देवी निमगाव ता. आष्टी, जि. बीड) हे दोघे संशयिरित्या फिरताना मिळून आले. पंचासमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे चाकू व गलोर मिळून आली. पोलिसांनी ती जप्त केली असून पोलीस अंमलदार सुभाष थोरात यांच्या फिर्यादीवरून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिवारी रात्री सव्वा बारा वाजता नगर- सोलापूर रोडवर आंबीलवाडी गावच्या शिवारात आदेश रादु चौधरी (वय 23) व विशाल जालिंदर बोराडे (वय 20 दोघे रा. ठोंबळ सांगवी ता. आष्टी, जि. बीड) हे दोघे संशयिरित्या फिरताना मिळून आले. त्यांच्याकडून दुचाकी व चॉपर जप्त करण्यात आले आहेत. त्यांच्याविरूध्द नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार कमलेश पाथरूट यांनी फिर्याद दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या