Saturday, July 27, 2024
Homeनाशिकचोरीच्या दुचाकींसह आरोपी जेरबंद

चोरीच्या दुचाकींसह आरोपी जेरबंद

देवळाली कॅम्प । वार्ताहर Deolali Camp

पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, उपायुक्त संजय बारकुंड, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत मोरे व पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांचे मार्गदर्शनाखाली युनिट 2 चे पोलीस हवलदार गुलाब सोनार, नंदकुमार नांदुर्डीकर, राजेंद्र घुमरे, अनिल लोंढे, संतोष ठाकूर यांनी चोरीच्या मोटरसायकली शोधण्याकामी मोहीम राबवली होती.

- Advertisement -

देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या संसरी गाव येथील अजय पासवान यांची यामाहा मोटारसायकल 29 ते 30 जुलै दरम्यान सोसायटीच्या पार्किंगमधून चोरी झाली होती. या प्रकरणी युनिट 2 कडून समांतर तपास सुरू असताना 26 ऑगस्ट रोजी पोलीस हवालदार गुलाब सोनार यांना सदर गुन्ह्यातील यामाहा गाडी ही कुणाल विजय लहांगे, रा. कोळीवाडा, संसरी गाव याने त्याचे साथीदारासह चोरी केल्याची गोपनीय माहिती मिळाली.

त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांचे मार्गदर्शनाखाली युनिट 2 च्या पथकाने संसरी गाव परिसरात सापळा लावून लहांगे यास ताब्यात घेतले. त्याची अधिक चौकशी करता त्याने गत महिन्यात दोन वेळा संसरी गाव परिसरातून त्याचे साथीदार वेदांत बच्छाव व प्रेम पाईकराव यांच्यासह मोटारसायकल चोरल्या असल्याची कबुली दिली. आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 2 लाख 5 हजार किमतीच्या दोन दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत.

चोरीतील यामाहा गाडी ही गुन्ह्यातील साथीदार वेदांत बच्छाव याच्याकडे असून दुसरी स्प्लेंडर प्लस मोटरसायकल ही त्याने विक्री केले असल्याचे सांगितले. गुन्हे शोध पथकाने त्याच्यासह साक्री धुळे येथे जाऊन तपास करून वेदांत चंद्रकांत बच्छाव (18), रा. पांजरा कॉलनी, ता. साक्री, जिल्हा धुळे चोंरीच्या दुचाकीसह मिळून आला. या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्तालयाकडून युनिट 2 चा गौरव केला जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या