Friday, September 20, 2024
Homeक्राईमNashik Crime News : चोरट्यांचा पोलिस कर्मचाऱ्यालाच गंडा

Nashik Crime News : चोरट्यांचा पोलिस कर्मचाऱ्यालाच गंडा

मोबाईल लांबवत केली ऑनलाईन खरेदी, गुन्हा दाखल

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

सामांन्यांच्या चीजवस्तू, मोबाइल चोरीचे प्रकार घडत असतानाच आता चोरट्यांनी (Thieves) पोलीसांवरही वक्रदृष्टी टाकल्याचे समोर आले आहे. कारण, एका पोलिस (Police) कर्मचाऱ्यालाच आठवडे बाजारात भाजी खरेदी करणे महागात पडले असून चोरट्यांनी पोलिसाचा मोबाइल लंपास करुन त्यातील ‘यूपीआय’द्वारे ९९ हजार दुसऱ्या बँकेत वळते करीत ९६० रुपयांची खरेदी केल्याची बाब उघड झाली आहे. १ लाख ९ हजार ९६० रुपयांची फसवणूक (Fraud) झाल्याने संबंधित पोलिसाने देवळाली कॅम्प पोलिसांत (Deolali Camp Police) फिर्याद दिली आहे.

त्यानुसार अज्ञातांविरुद्ध चोरीसह फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सायबर गुन्हेगारांचे अनेक फंडे समोर येत असताना आता गर्दीच्या (Crowd) ठिकाणाहून मोबाइल (Mobil) चोरुन त्यातील अॅपद्वारे बँकांचे व्यवहारही केल्याचे धक्कादायक बाब उघड झाली आहे. गंभीर बाब म्हणजे, चोरट्यांनी पोलिस कर्मचाऱ्यालाच गंडविल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, देवळाली कॅम्प पोलिस वसाहतीतील रहिवाशी दिपक सखाराम सरकटे (वय ३८) हे सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बाजारात भाजीपाला खरेदी करीत होते.

त्यावेळी अज्ञाताने त्यांचा दहा हजार रुपयांचा मोबाइल लंपास केला. त्यानंतर रात्री दहा वाजेच्या सुमारास ‘यूपीआय’द्वारे (UPI) कोलकाता येथील स्टेट बँकेच्या एका खात्यात ९९ हजार रुपये संशयिताने वळते केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सायंकाळी ९६० रुपये ऑनलाइन खर्च केले. हा प्रकार लक्षात येताच सरकटे यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षकांकडे तपास देण्यात आला आहे.

सखोल तपास सुरु

दरम्यान, चोरटे हे फिर्यादीच्या परिचयातील होते का, संशयितांना फिर्यादींच्या मोबाइलचा पासवर्ड, बँक ॲपचा पासवर्ड, यूपीआयचा पासवर्ड कसा ठाउक, नेमके कोलकाता येथील बँकेतच पैसे का पाठविले, ऑनलाइन खरेदी नेमकी कोणत्या वस्तूंची केली यासंदर्भात देवळाली कॅम्प पोलिस तपास करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या