Tuesday, March 25, 2025
Homeक्राईमNashik Crime News : लिफ्ट देणे भोवले; वृद्धास मारहाण करून लुटले

Nashik Crime News : लिफ्ट देणे भोवले; वृद्धास मारहाण करून लुटले

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिकरोड येथे संशयिताला दुचाकीवरून लिफ्ट देणे ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला भोवले आहे. संशयिताने (Suspected) अंधारात नेऊन वयाेवृद्धास दगडाने मारहाण (Beating) करून दागिने, मोबाईल व मोपेड हिसकावून पोबारा केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी उपनगर पोलिसात (Upnagar Police) लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : मोठी बातमी! नाशकात एटीएसची कारवाई; बांगलादेशी घुसखोर ताब्यात

ॲन्थोनी गॅब्रियल साळवे (६५, रा. हरिवंदन सोसायटी, जेलरोड) यांच्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी (दि. १६) रात्री साडेदहाच्या सुमारास ते ॲक्टिवा मोपेडवरून (एमएच १५ इएम ६३३१) सेट अण्णा चर्च येथून घराकडे जात होते. त्यावेळी संशयित युवकाने त्यांच्याकडे लिफ्ट मागितली. त्यांनी संशयिताला बसवून निघाले असता, संशयिताने त्यांना क्रोमा शोरुमजवळील मोकळ्या जागेकडे नेले. त्याठिकाणी गेल्यानंतर संशयिताने साळवे यांना दगडाने मारहाण केली.

हे देखील वाचा : Nashik Rain News : अवघ्या तासाभराच्या पावसाने नाशिकमध्ये रस्ते तुंबले

दरम्यान, त्यानंतर संशयिताने त्याच्या मित्राला फोन करून बोलावून घेतले. दोघांनी साळवे यांना मारहाण करून त्यांच्या हातातील ३० हजाराची सोन्याची अंगठी, चांदीची अंगठी, ५ हजारांचा मोबाईल, १५ हजारांची मोपेड व एटीएम कार्ड असा ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल हिसकावून साळवे यांचीच मोपेडवरून पसार झाले. उपनगर पोलिसात मारहाणीसह लुटमारीचा गुन्हा दाखल (Case Register) करण्यात आला असून, उपनिरीक्षक पवार हे तपास करीत आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...