Monday, June 24, 2024
Homeक्राईमNashik Crime News : चोरट्यांनी केला कहर; फ्रिजमध्ये लपविलेले दागिने केले लंपास

Nashik Crime News : चोरट्यांनी केला कहर; फ्रिजमध्ये लपविलेले दागिने केले लंपास

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

जगन्नाथपुरी येथे देवदर्शनासाठी गेलेल्या कुटुंबाच्या बंगल्यात शिरुन चोरट्यांनी (Thieves)सोन्याचा राणीहार, पोत, मणी, जोडवे आणि वेल असे दागिने लंपास केल्याची घटना पखालरोड परिसरात घडली. विशेष म्हणजे, ‘फ्रिज’ मध्ये दागिने लपविले असतानाही चोरट्यांनी ते शोधून काढत चोरुन नेले. याप्रकरणी १ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल चोरल्याप्रकरणी अज्ञातांविरुद्ध मुंबई नाका पोलिसांनी (Mumbai Naka Police) घरफोडीचा गुन्हा नोंदवला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वडाळागावातील (Wadalagaon) रहिवाशी नरेंद्र वनवे (वय ५४) यांनी मुंबई नाका पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यांची बहिणी अनिता देविदास पिंगळे यांच्या राहत्या बंगल्यात ही घरफोडी झाली. अनिता व देविदास हे दोघे ३ जून रोजी रात्री साडेबारा वाजता जगन्नाथ पुरी येथे देवदर्शनासाठी रवाना झाले. त्यानंतर ५ जून रोजी मध्यरात्री एक वाजता त्यांचे जावई आशुतोष लेंडे हे पुणे येथून नाशिकमध्ये (Nashik) विधी परीक्षेसाठी पोहोचले.
त्यांनी सासऱ्यांच्या घराचा मुख्य दरवाजा स्वता:कडील किल्लीने उघडला.

दरम्यान, त्यावेळी घरात चोरी झालाचा संशय आल्याने त्यांनी वनवे यांना कळविले. वनवे यांनी बंगल्याची पाहणी केल्यावर पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक निसार शेख पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, गत महिन्यांत इंदिरानगर पोलिसांच्या हद्दीत एका घरफोडीत वॉशिंग मशिनमध्ये लपविलेले दागिने (Jewelry) चोरट्यांनी लंपास केले होते.

असा झाला उलगडा

३ जून रोजी पिंगळे दाम्पत्य जगन्नाथ पुरीला निघाले. त्यांचे जावई ५ जून रोजी मध्यरात्री १ वाजता बंगल्यात पोहोचले. त्यांनी मुख्य दरवाजा किल्लीने उघडला. तेव्हा घरातील सर्व सामान अस्ताव्यस्थ होते. कपाट आणि मागील दरवाजा उघडा होता. टेरेसवरील लोखंडी दरवाजाही उघडा होता. यासह तेथील भिंतीचा भाग तुटलेला दिसल्याने त्यांनी माम सासरे वनवे यांना कळविले. त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन बहिण अनिता हिला फोन केला. त्यांनी ‘फ्रिजरमध्ये दागिने ठेवलेत, ते आहे का बघ’, असे सांगितले. वनवे यांनी फ्रिजर बघितल्यावर तिथेही दागिने नव्हते.

एक इमारत, दोन घरफोड्या

आनंदवली येथील रिजेन्सी टॉवरमधील संजय अनंत मराठे यांच्या घराचा बंद दरवाजा तोडून चोरट्यांनी सोन्याचांदीचे दागिने लंपास केले. ९४ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल चोरल्याप्रकरणी मराठे यांनी गंगापूर पोलिसांत फिर्याद दिली आहे. मराठे यांचे शेजारी महेश रामचंद्र लादे यांच्या घरातून सहा हजार रुपये रोख व चार पेनड्राइव्हसह आधारकार्ड, स्कूलबॅग चोरट्यांनी पळविली. गंगापूर पोलिसांनी एकत्रित घरफोडी नोंदवून तपास सुरु केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या