Sunday, September 8, 2024
Homeक्राईममोटारसायकलींसह चोरटे पोलीसांच्या ताब्यात

मोटारसायकलींसह चोरटे पोलीसांच्या ताब्यात

चाळीसगाव । प्रतिनिधी –

चाळीसगाव पोलिसांच्या पथकाने एका संशयीत आरोपीतांना ताब्यात घेवुन,त्यांचेकडुन चोरीच्या दोन मोटार सायकली जप्त केल्या आहेत. याप्रकरणी चाळीसगाव पोलीसात गुन्हां दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

चाळीसगाव पोलिसांनी दि.8 रोजी पो.आधिक्षक महेश्वर रेड्डी यांच्या आदेशाने व कविता नेरकर (पवार), अप्पर पोलीस अधिक्षक चाळीसगांव तसेच अभयसिंग देशमुख, सहायक पोलीस अधिक्षक चाळीसगाव भाग चाळीसगाव यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहरात पोलीस स्टेशन हद्दीत सक्त पेट्रोलिंग करण्याची मोहीम राबविण्यात आली होती.

पेट्रोलिंग करीत असतांना गोपनीय बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, बेलखेडा ता.कन्नड येथील दोन इसम हे दोन मोटार सायकली मार्केट कमिटी परीसरात विक्री करीता येणार आहे.
पोलीस निरीक्षक संदिप पाटील यांच्या मार्गदर्शानाखाली लागलीच पोलीस पथक मिळालेली माहीतीची खात्री करणे करीता रवाना होवुन मार्केट कमिटी परीसरात जावुन अंधारात थांबले असता दोन इसम हे त्यांचे ताब्यात दोन मोटार सायकली घेवुन मार्केट कमिटीचे आत आले. तेव्हा त्यांना जागीच पकडुन त्यांचे ताब्यातील मोटार सायकलींबाबत विचारपुस करता, त्यांनी उडवा उडवीचे उत्तरे दिली. तेव्हा त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता बापुजी उर्फ लखन बळीराम राठोड वय-35 रा.बेलखेडा तांडा ता.कन्नड जि. छत्रपती संभाजी नगर, विवेक गणु आडे वय-33 रा.बेलखेडा ता.कन्नड जि.छत्रपती संभाजी नगर असे सांगितले. दोघांच्या ताब्यात 50 हजार किंमतीच्या दोन मोटार सायकली (प्लॅटीना, फॅशन प्रो) अशा मिळुन आल्याने सदर इसमाविरुध्द पोकॉ समाधान पाटील यांचे फिर्यादीवरुन गुरनं. 248/2024 महा.पोलीस अधिनियम कलम-124 प्रमाणे गुन्हा दाखल करुन आरोपीतांचे ताब्यात मिळालेल्या मो.सा. हे जप्त करण्यात आले आहेत. सदर मोटर सायकल कल्याण, ठाणे येथून चोरी केल्याची माहिती मिळाली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ अजय पाटील व पोकॉ ज्ञानेश्वर पाटोळे हे करीत आहेत.

यांनी केली कारवाई – चाळीसगाव पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदिप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ राहुल सोनवणे, पोहेकॉ अजय पाटील, पोना भुषण पाटील, पोना महेंद्र पाटील, पोकॉ विजय पाटील, पोकॉ आशुतोष सोनवणे, पोकॉ रविंद्र बच्छे, पोकॉ पवन पाटील, पोकॉ ज्ञानेश्वर गिते, पोकॉ ज्ञानेश्वर पाटोळे, पोकॉ समाधान पाटील, पोकॉ राकेश महाजन, पोकॉ मनोज चव्हाण यांच्य पथकाने ही कारवाई केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या