Monday, July 22, 2024
Homeनगरचोरीला गेलेली मोटारसायकल एका तासात पकडली

चोरीला गेलेली मोटारसायकल एका तासात पकडली

जामखेड |तालुका प्रतिनिधी| Jamkhed

- Advertisement -

शहरातील बाजारतळ येथुन एक मोटार सायकल चोरी गेलेली मोटारसायकल तातडीने पोलिसांनी सुत्रे फिरविल्याने एका तासात सापडली.

येथील व्यापारी सुनील चोरडीया हे होंडा कंपनीची अ‍ॅक्टीवा क्रमांक एम. एच. 16 बी. क्यू. 1559 स्कुटी गाडी उभी करून बाजार करण्यासाठी गेले असता बाजार घेतल्यानंतर गाडी चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. काही वेळ शोधाशोध करून काही उपयोग होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी जामखेड पोलीस स्टेशनला गाडी चोरी गेली असल्याचा अर्ज दिला.

यावरून जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली तात्काळ सुत्रे हालवत पोलीस कॉ. आजीनाथ जाधव, पोलीस कॉ. शिवलिंग लोंढे यांनी शहरातील विविध भागात शोध घेतला असता कुंभरतळे या ठिकाणी सदर गाडी रस्त्यावर उभी असल्याचे आढळून आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या