Friday, November 22, 2024
Homeक्राईमNashik News : जनावरे डांबून ठेवल्याप्रकरणी तेरा जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Nashik News : जनावरे डांबून ठेवल्याप्रकरणी तेरा जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

पाच लाखांचा मुद्देमालही हस्तगत, युनिट एकची कारवाई

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

भद्रकाली परिसरातील ( Bhadrakali Area) तिग्रारानीया रस्त्यावरील सागर बेकरी समोरच्या एका पत्र्याच्या शेडमध्ये गोवंशाची कत्तल करुन काही जनावरे (Animals) डांबून ठेवल्याची धक्कादायक बाब उघड झाली. गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने छापा (Raid) टाकून चौदाशे किलो गोवंशीय मांस, वीस गोवंश जनावरे आणि वाहन असा पाच लाख ५४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी तेरा जणांना पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Fraud News : नफ्याच्या आमिषाने गमविले ५९ लाख रुपये

याबाबत अधिक माहिती अशी की, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांनी गोवंश कत्तल व तस्करीला आळा घालण्याचे सक्त आदेश दिले आहेत. त्यानुसार उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी पथकाला सूचना दिल्या. गुन्हे युनिट दोनचे वरिष्ठ निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या पथकाला मध्यरात्री गोवंश कत्तलीसंदर्भात माहिती मिळाली. त्यानुसार श्रेणी उपनिरीक्षक अजय पगारे, सहायक उपनिरीक्षक यशवंत बेंडकुळे, बाळू शेळके, विवेक पाठक, अंमलदार प्रकाश भालेराव, नंदकुमार नांदुर्डीकर, अतुल पाटील, जितेंद्र वजीर यांचे पथक पोहोचले.

हे देखील वाचा : ऑनलाईन सट्टेबाजी आणि क्रौर्य

यावेळी भद्रकाली पोलिसांच्या (Bhadrakali Police) मदतीने पत्र्याच्या शेडमध्ये पथकाने छापा टाकला. त्यावेळी बेकायदेशीरपणे काही गोवंशांची कत्तल करुन मांस लपविल्याचे दिसले. संशयितांना ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध भद्रकाली पोलिसांत महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम व प्राण्यांना क्रुरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

हे देखील वाचा : सायबर फसवणुकीला उधाण

हे आहेत संशयित

गोवंश कत्तल व जनावरे डांबल्याप्रकरणी अमीन अय्युब कुरेशी (वय २६, रा. बागवान पुरा), जुनेद नजीर कुरेशी (२१), अमीन नासीर पठाण (२०, दोघे रा. नानावली), ईस्माईल अनिस कुरेशी (२५, रा. पंचशिल नगर), रिजवान सुलेमान कुरेशी (२९), नईम रहीम कुरेशी (२४, दोघे रा. भारतनगर), सोनू महम्मद कुरेशी (२२, रा. बागवानपुरा), मोबीन युनूस कुरेशी (२६, रा. नाईकवाडी), मजीद अब्दुला कुरेसी (३२, रा. गंजमाळ), जावेद रहीम कुरेशी (२६, शिवाजीवाडी), आरीफ ईस्माईल शेख (३८, रा. कथडा), मुक्या कुरेशी आणि शब्बीर कुरेशी (रा. भद्रकाली) या तेरा संशयितांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या