Friday, April 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजबिबट्याच्या हल्ल्यात तेरा वर्षीय मुलाचा मृत्यू

बिबट्याच्या हल्ल्यात तेरा वर्षीय मुलाचा मृत्यू

चाळीसगाव / मनोहर कांडेकर

- Advertisement -

गणेशपुर पिंपरी येथे एका १३ वर्षे मुलावर बिबट्याने हल्ला केला असून यात त्याचा मृत्यू झाला आहे. मयताचे नाव रिंकेश नंदू मोरे असे आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून गेल्या सहा वर्षांपूर्वी नरभक्षक बिबट्याची आठवण पुन्हा ताजी झाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की रिंकेश मोरे हा गणेशपुर-पाचोरा रस्तावर मुलांसोबत रनिंग साठी गेला असता, चार मुले रनिंग करत पुढे गेली व तो मागे रनिंग करत असताना, अचानक शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला, आणि ओढत शेतात नेले. पुढे रनिंग साठी गेलेल्या मुलांना आपला मित्र दिसत नसल्यामुळे त्यांनी शोधाशोध केली, परंतु तो मिळून आला नाही, याबाबतची माहिती घरी जाऊन मुलांनी दिली असता आई-वडील त्याला शोधायला गेले असता, प्रकाश काशिनाथ पाटील यांच्या शेतात मृत अवस्थेत तो आढळून आला.

या घटनेने परिवाराने एकच आक्रोश केला. रात्री उशिरापर्यंत वन विभागाकडून पंचनामा सुरू होता. दरम्यान याच ठिकाणी संकाळी बिबट्याने बकरी फस्त केल्याची माहिती मिळत आहे.

नरभक्षक बिबट्याच्या आठवणी पुन्हा ताज्या
गेल्या सहा ते सात वर्षांपूर्वी चाळीसगाव तालुक्यात सायगाव परिसरात नरभक्षक बिबट्याने तब्बल सहा जणांचा बळी घेतला होता. त्याला ठार करण्यात आले त्याच आठवणी आता पुन्हा ताज्या झाल्या असून चाळीसगाव तालुक्यात पुन्हा नरभक्षक बिबट्याची दहशत पसरली आहे. अजून बळी घेण्याच्या अगोदरच त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...