Friday, September 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजट्रॅक्टर ट्रॉलीच्या धडकेत तेरा वर्षीय बालकाचा मृत्यू

ट्रॅक्टर ट्रॉलीच्या धडकेत तेरा वर्षीय बालकाचा मृत्यू

- Advertisement -

कसबे सुकेणे | प्रतिनिधी

येथील रमाई नगर त्रिफुलीजवळ उसाने भरलेल्या जुगाड ट्रॉलीच्या धडकेत सापडून गंभीर जखमी झालेल्या तेरा वर्षे मुलाचा मृत्यू झाला आहे.वंश प्रमोद कर्डक (13) असे मृत बालकाचे नाव आहे.

ओझर व कसबे सुकेणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्वराज्य 744 हा उसाने भरलेला ट्रॅक्टरजात असताना कसबे सुकेणे येथील रमाई नगर येथे वळण घेत असताना रस्त्याने पायी जाणारा वंश कर्डक यास ट्रॉलीची धडक बसली , ट्रॉलीचे चाक पोटावरून गेल्याने गंभीर दुखापत झाली. त्यास पिंपळगाव बसवंत व मेडिकल कॉलेज आडगाव येथे नेले असता औषध उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ट्रॅक्टर चालक गोकुळ एकनाथ राठोड, रा. चाळीसगाव, जि. जळगाव याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे कसबे सुकेणे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

ताज्या बातम्या

नाशिक जिल्ह्यातील १३ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

0
नाशिक, दि. ४ सप्टेंबर (जिमाका वृत्तसेवा) : Nashik खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण कृषी निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाने जिल्ह्यात कारवाई सुरू केली आहे....