Sunday, September 27, 2026
Homeब्रेकिंग न्यूजबिबट्याच्या हल्ल्यात तेरा वर्षीय मुलगी जखमी

बिबट्याच्या हल्ल्यात तेरा वर्षीय मुलगी जखमी

पेठ | प्रतिनिधी Peth

- Advertisement -

तालुक्यातील मोहाचापाडा येथे शेतातील जनावरांच्या गोठ्यातील वासरावर बिबट्याने हल्ला करत ठार केले व घराच्या ओट्यावर झोपलेल्या व पाहुणी म्हणून मामाकडे आलेल्या मुलीवर हल्ला करत तिच्या मानेला धरून फरफटत बिबट्या नेत असता मुलीच्या मामाने आरडा ओरडा करत बिबट्याच्या तावडीतून मुलीची सुटका केली मुलीच्या मानेवर खोलवर जखमा होवुन रक्तस्राव झाला तिस तातडीने पेठ ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करून अधिक उपचारसाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.

मोहाचा पाडा (कुंभाळे ) येथिल गट नंबर ३६ मधील राजेश मधुकर राऊत यांचे शेतात पक्के घराचे समोर ओट्यावर सर्व कुटुंब झोपले होते त्यांची भाची साक्षी विलास बोरसे वय १३ (उस्थळे) हिच्यावर पहाटे ४.३० वाजेच्या दरम्यान बिबट्याने हल्ला केला व मानेला न पकडून घसरत नेले व तिचे मामा राजेश राऊत यांनी आरडा ओरडा केल्याने मुलीला खाली टाकून बिबट्याने पळ काढला.

तर दुस-या घटनेत तालुक्यातील उबंरपाडा (आडगाव) येथिल शेतातील घरात पहाटेच्या चार वाजेच्या सुमारास कुत्र्यावर हल्ला करत ठार केले तर घरातील महिला आनंदी किसन राऊत यांच्या हातावर झडप मारून किरकोळ जखमी केले.तालुक्यात विविध भागात बिबट्याने हैदोस घातला असुन बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मोहपाडा परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावला आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : राजकारणात टीका करताना लक्ष्मणरेषेचे भान ठेवा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar राजकीय टीका करताना कौटुंबिक विषय टाळले पाहिजेत. आमच्यावर राजकीय टीका करा, आमच्या कार्यपद्धतीवर किंवा सरकारच्या कामावर टीका करा, मात्र कौटुंबिक वादात...