Monday, November 25, 2024
Homeधुळेया खताला आला सोन्याचा भाव!

या खताला आला सोन्याचा भाव!

कुरखळी curkhli । वार्ताहर

वाढलेल्या रासायनिक खतांच्या (Increased chemical fertilizers) किंमती (prices), चढ्या भावाने होणारी विक्री, वेळेवर न होणारा पुरवठा (untimely supply) आदी कारणांमुळे परिसरासह तालुक्यातील शेतकरी (farmer) शेणखताकडे (Dung manure) वळाले आहेत. या भागात शेणखताला सध्या सोन्याचे (Gold prices) भाव आले असून, शेतकरी, पशुपालकांनाही आर्थिक उत्पन्न मिळू लागले आहे.

- Advertisement -

VISUAL STORY : आज आहे या लिंबु कलर अभिनेत्रीचा वाढदिवस… करिअरच्या यशोशिखरावर असतांनाच लग्न करून झाली अमेरीकेत सेटलPhotos # प्रकाशा येथे ट्रक – मिनी ट्रक मध्ये भीषण अपघात

पावसाळा लवकरच सुरू होणार असल्याने शेती मशागतीच्या कामांना वेग आला आहे. पावसाळ्यापूर्वी शेतात शेणखत टाकण्यावरही अनेकांनी भर दिला आहे. रासायनिक खतापेक्षा शेणखत सरस आहे. याचा कोणताही दुष्परिणाम पिकांवर व जमिनीवर होत नाही. उत्पादनात मोठी वाढ होण्यासह अमिनीची सुपिकता टिकून जमिनीचा पोत सुधारतो. एकदा खत दिल्यानंतर तीन वर्षे त्याचे परिणाम दिसतात. यामुळे परिसरातील शेतकरी शेणखत खरेदीसाठी धावपळ करीत आहेत. शेणखत व लेंडी खताला सध्या सोन्याचे दिवस आले आहेत.

VISUAL STORY : ५४ व्या वर्षीही या अभिनेत्रीने गुलाबी साडीत तापवलं वातावरणVISUAL STORY : हास्य जत्रेतील प्राजक्ताचा हा लुक पाहाल तर… काळीज होईल खल्लास…

जनावरांची संख्या रोडावल्याने शेणखत कमी प्रमाणात उपलब्ध आहे. उपलब्ध खत खरेदीसाठी शेतकरी प्रयत्नशील आहेत. शेणखताची एक टॅक्टरची ट्रॉली 4 हजार 500 रुपयापर्यंत विक्री होत असून, लेंडी खताची एक टॅक्टर ट्रॉली 3 हजार 500 रुपयापर्यंत मिळत आहे. हा खत खरेदी करण्यासाठी शेतकर्‍यांची धावपळ सुरू आहे.

बोफखेल ग्रामपंचायतीचा ठेका घेणे भोवले, पाच सदस्य अपात्रअवकाळी पावसाचा मिरची उत्पादकांना फटका, लागवड धोक्यात

पशुपालन व शेळी पालन हा व्यवसाय चांगला आहे. रासायनिक खतांचे भाव वाढल्याने शेणखत व लेंडी खताला मोठी मागणी आहे. रासायनिक खतांचे वाढलेले भाव, वाढती रोजदारी आदी कारणाने शेती कसणे परवडत नाही. यावर्षी शेतात शेणखत व लेंडी खत टाकण्यासाठी विकत घेतला आहे. या खतामुळे जमिनीचा पोत सुधारणार असून, उत्पादनातही वाढ होणार असल्याच्या प्रतिक्रिया शेतकर्‍यांनी दिल्या.

लोक अदालतीने घरकुल लाभार्थ्यांना दिला हा इशारा….

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या