Friday, June 21, 2024
Homeमुख्य बातम्या'शेतकऱ्यांनी स्वातंत्र्य लढून मिळवलं, भिकेत मिळालं नाही'

‘शेतकऱ्यांनी स्वातंत्र्य लढून मिळवलं, भिकेत मिळालं नाही’

दिल्ली l Delhi

- Advertisement -

गेल्या वर्षभरापासून केंद्र सरकारच्या (Modi govt) तीन कृषी कायद्यांविरोधात (farm law) शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आता मोठं यश आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा सरकारने केल्यानंतर देशभरातील विरोधीपक्षांकडून, शेतकरी संघटनांकडून आणि आंदोलनाचं समर्थन करणाऱ्या नागरिकांकडून दिल्लीतील शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या गेल्या. दरम्यान या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यांनी मोदी सरकारवर टीका तर केलीच मात्र अभिनेत्री कंगना आणि अभिनेते विक्रम गोखले यांना देखील टोला लगावला आहे.

‘शेतकऱ्यांच्या संघर्षापुढे सरकारला झुकावं लागलं. शेतकऱ्यांसाठी हा खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिन आहे. शेतकऱ्यांनी हे स्वातंत्र्य लढून मिळवलं आहे. भिकेत मिळालं नाही, असा म्हणत संजय राऊतांनी भाजपसह अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) आणि अभिनेते विक्रम गोखले (vikram gokhale) यांना खोचक टोला लगावला आहे.

तसेच ‘दीड वर्षापासून शेतकरी ज्या तणाव, दबाव आणि दहशतीखाली होता. त्याचे जोखड आता निघाले आहे. स्वातंत्र्य म्हणजे काय असतं? कंगना रणौत सांगते ते स्वातंत्र्य नाही किंवा विक्रम गोखले (Vikram Gokhale) म्हणतात, ते स्वातंत्र्य नाही. त्यांची व्याख्या वेगळी असेल. तुमच्या मनावरचं जोखड निघून जातं, फेकलं जातं. ते स्वातंत्र्य असत,’ असा टोमणाही यावेळी संजय राऊतांनी मारला आहे.

तसेच ‘शेतकरी हा आपल्या शेतीचा मालक नसून गुलाम बनवण्याचा हा कायदा होता. नव्या प्रकारची कॉर्पोरेट जमीनदारी ही देशात लादली जाणार होती. ईस्ट इंडिया कंपनीने देश ज्या पद्धतीने पारतंत्र्यात टाकला, त्याच पद्धतीने भांडवलदारांना ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जमिनीवर कब्जा करण्यासाठी एक कायदा बनवला होता. देशातील शेतकऱ्यांनी एकजुटीने दीड वर्ष रस्त्यावर ऊन, वारा, पाऊस, बलिदान देत, मंत्र्यांनी गाडीने चिरडत आणि पोलिसांनी गोळीबार केल्यानंतरही ते हटले नाहीत.’ असं म्हणत राऊतांनी मोदी सरकारवर टीका केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या