Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रCabinet Meeting : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले 'हे' महत्वाचे निर्णय

Cabinet Meeting : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ महत्वाचे निर्णय

मुंबई | Mumbai

आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक (Cabinet meeting) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील अन्य मंत्री उपस्थित होते. या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत या निर्णयांची माहिती दिली आहे…

- Advertisement -

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत असलेल्या तरुणाची मुंबईत आत्महत्या

या बैठकीस शिंदे-फडणवीस-पवार सरकारने (Shinde-Fadnavis-Pawar Government) बार्टी, सारथी, महाज्योती आणि अमृत या संस्थांच्या कार्यक्रमांमध्ये समानता आणण्यासाठी सरकारी धोरण राबविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राज्यातील सुतगिरण्या सुरळीत चालण्यासाठी कर्जावरील व्याज भरण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. याशिवाय राज्यामध्ये आणखी चार धर्मादाय सहआयुक्त पदांची निर्मिती करण्याचा निर्णय देखील बैठकीत घेण्यात आला आहे.

Sanjay Raut : “ललित पाटील केवळ मोहरा, हिंमत असेल तर…”; राऊतांचे फडणवीसांना आव्हान

राज्य मंत्रिमंडळच्या बैठकीतील निर्णय खालीलप्रमाणे

बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत या संस्थांच्या कार्यक्रमांत समानता आणण्यासाठी धोरण.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबईमधून शासकीय बँकिंग व्यवहार करता येणार.

राज्यातील सूतगिरण्या सुरळीतपणे चालवणार. पुढील पाच वर्षे कर्जावरील व्याज शासन भरणार.

कोराडीत सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावरील वीज प्रकल्पास मान्यता.

इमारत व बांधकाम कामगारांना कल्याणकारी योजनांचा लाभ गतीने मिळणार. कामगार नियमांत सुधारणा करणार.

अहमदनगर जिल्ह्यात नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय.

महाप्रितमार्फत ठाण्यात समूह गृहनिर्माण प्रकल्प राबविणार. परवडणारी घरे मोठ्या प्रमाणावर उभारणार.

राज्यात चार धर्मादाय सह आयुक्त पदांची निर्मिती करणार.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

IND vs BAN : विश्वचषक स्पर्धेत आज भारत-बांगलादेश भिडणार; कुणाचे पारडे जड?

- Advertisment -

ताज्या बातम्या