Friday, October 11, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिक विमानसेवेबाबत 'हा' महत्वाचा निर्णय

नाशिक विमानसेवेबाबत ‘हा’ महत्वाचा निर्णय

नाशिक | प्रतिनिधी Nashik

एचएएलकडून ( HAL )20 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर असे 14 दिवस रन-वे देखभाल व दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे या काळात नाशिक विमानतळ ( Nashik Air Port )सर्व विमान वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात आले आहे.

- Advertisement -

चार प्रमुख शहरांचीसुरु असलेली विमान सेवा आधीच अलायन्स एअरने गुंडाळलेली आहे. सुरु असलेली स्पाइस जेटची हैदराबाद व दिल्ली शहरांसाठील दुरुची विमानसेवाही 20 नोव्हेंबर ते 3 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याने प्रवाशी नाराजी व्यक्त करीत आहेत.

सध्या स्पाइसजेटकडूनच नाशिक विमानतळावरुन विमानसेवा दिली जात आहे. एचएएलकडून देखील विमानसेवेला पाठबळ दिले जात आहे. रन-वेचे देखभाल-दुरुस्तीचे काम दरवर्षी केले जाते. त्याअंतर्गत रविवारी 20 नोव्हेंबर ते 3 डिसेंबरपर्यंत देखभाल व दूरुस्ती केली जाणार आहे.

याकाळात स्पाइस जेटच्या विमान सेवा शिर्डीतून चालविल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रत्यक्षात शिर्डी विमानतळावर हवामानाचा विपरित परिणाम मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे रात्रीची सेवा वळवणे कठीण असल्याचे आयमाच्या एव्हिएशन कमिटीचे चेअरमन मनीष रावल यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या