निफाड | वार्ताहर Niphad
माझ्या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. यापूर्वी झालेल्या किरकोळ घटनांमुळे मी नाराज नाही. याउलट ते चाहत्यांचे प्रेमच आहे, अशी प्रतिक्रिया सोशल मीडिया स्टार गौतमी पाटील हिने दिली.
येथे आयोजित एका कार्यक्रमानिमित्त आलेल्या गौतमी पाटील हिने प्रथमच माध्यमंशी संवाद साधला. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात झालेल्या किरकोळ वादामुळे गौतमीचा कार्यक्रम वादात सापडला होता. त्यानंतर शनिवारी (दि. ४) निफाडला भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर तिने ही प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली माझ्या कार्यक्रमात झालेल्या प्रकाराची महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे याबाबत मी काय बोलावे. मात्र, झाला प्रकार हा चाहत्यांच्या प्रेमाचेच प्रतीक आहे. यापुढे महाराष्ट्राची संस्कृती टिकवण्यासाठी चाहत्यांनी सहकार्य करावे, असे आवाहनही गौतमीने केले.