Friday, November 15, 2024
Homeराजकीय'हे अत्यंत दुर्दैव!', मध्यप्रेदशातील 'त्या' प्रकरणावर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

‘हे अत्यंत दुर्दैव!’, मध्यप्रेदशातील ‘त्या’ प्रकरणावर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

दिल्ली | Delhi

माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते कमलनाथ (Kamal Nath) यांनी भाजप आमदार इमरती देवी यांच्याविषयी ‘आयटम’ असा आक्षेपार्ह उद्गार काढल्याने मध्यप्रदेशातील राजकारण प्रचंड तापले आहे. दरम्यान या संपुर्ण प्रकरणात कमलनाथ यांनी आपल्या ‘आयटम’ या वक्तव्यावर खुलासा देखील केला आहे. या सर्व प्रकरणावर खा. राहुल गांधी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

राहुल गांधी यांनी म्हंटले आहे कि, “कमलनाथजी माझ्या पक्षाचे असले तरी त्यांनी वापरलेली भाषा मला वैयक्तिकरित्या बिलकूल आवडलेली नाही. मी त्याचे कदापि समर्थन करणार नाही, मग ती व्यक्ती कोणीही असो. हे अत्यंत दुर्दैवी आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले. मात्र, एरवीदेखील आपल्या देशात महिलांना देण्यात येणाऱ्या एकंदरीत वागणुकीत खूपच सुधारणा होण्याची गरज आहे. मग ती कायदा-सुव्यवस्था असो किंवा त्यांचा आदर करणे असो. आपल्या देशातील महिलांनी उद्योग, राजकारण आणि इतर क्षेत्रांमध्ये स्वत:ला सिद्ध करुन दाखवले आहे. त्या आपल्या देशाचा अभिमान आहेत, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केले आंदोलन

कमलनाथांच्या त्या आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आंदोलन केले. त्यांच्या मंत्र्यांनी आणि नेत्यांनी यावर एक दिवसांचे मौन व्रत ठेवले. शिवराज सिंह चौहान यांनी कमलनाथांच्या या वक्तव्याला महाभारतातील द्रौपदीच्या अपमानाशी जोडले आणि ते म्हणाले, “मला यावर स्पष्टीकरण अपेक्षित होते. पण अशा आक्षेपार्ह वक्तव्याचे समर्थन केले जात आहे. तुम्ही मला काहीही नावे ठेवू शकता, माझ्यावर काहीही टीका करु शकता पण अशीरीतीने नवरात्रीच्या काळात एका महिलेचा अपमान करणे हे समस्त महिला वर्गाचा अपमान करण्यासारखे आहे. याबाबतीत कमलनाथांनी सगळ्या सीमा ओलांडल्या आहेत.”

…म्हणून ‘आयटम’ बोललो; माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे स्पष्टीकरण

..या मुद्द्यावरुन इमरती देवींनी कमलनाथ यांच्यावर सडकून टीका

या मुद्द्यावरुन इमरती देवींनी कमलनाथ यांच्यावर सडकून टीका केली आहे. त्यांनी त्यांचा कमलनाथ नाही तर ‘कलंकनाथ’ असा उल्लेख केला. त्या पुढे म्हणाल्या की, “मी एका गरीब घरातून राजकारणात आली आहे. घरदार सांभाळून मला राजकारण करावे लागते. कमलनाथांच्या वक्तव्यावरुन लक्षात येतं की त्यांचा महिला राजकारणात याव्यात या गोष्टीला विरोध आहे आणि असे जर असेल तर ते कमलनाथ नाहीत तर कलंकनाथ आहेत.”

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या