व्हॉट्सअ‍ॅप युजर्सला बसणार मोठा फटका; नवीन पॉलिसीने ‘ही’ सेवा बंद होणार?

jalgaon-digital
1 Min Read

मुंबई | Mumbai

व्हॉट्सअ‍ॅपवरील (WhatsApp) कॉल सर्व्हीसने आपली अनेक कामे सुलभ केली आहेत. तसेच जेव्हा फोनमधील डेटा पॅक संपतो, तेव्हा लोक व्हॉट्सअॅप कॉलिंग करतात, ज्यासाठी त्यांना फक्त इंटरनेटची (Internet) आवश्यकता असते. मात्र आता या फीचरमध्ये मोठा बदल होणार आहे…

सध्या व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक (Facebook) इन्स्टाग्राम (Instagram) या सोशल मीडिया अॅप्सवर मोफत कॉलिंग सेवा दिली जाते. पंरतु ही सुविधा लवकरच संपुष्टात येण्याची शक्यता आहे. याबाबत लोकांचे मत जाणून घेण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) दूरसंचार विधेयकाचा मसुदा प्रसिद्ध केला असून व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकच्या माध्यमातून कॉल किंवा मेसेज पाठवण्याची सुविधा दूरसंचार सेवा मानली जाईल, अशी तरतूद या विधेयकात (bill) करण्यात आली आहे.

त्यासाठी या कंपन्यांना परवाना घ्यावा लागणार आहे. या विधेयकाचा मसुदा दूरसंचार विभागाच्या (Department of Telecommunication) वेबसाइटवर सर्वांना उपलब्ध करून देण्यात आला असून यासोबतच विभागाने या विधेयकावर उद्योग क्षेत्राकडून सूचनाही मागवल्या आहेत. यावर २० ऑक्टोबरपर्यंत मत मांडता येईल. दुसरीकडे हे विधेयक मंजूर झाल्यास दूरसंचार विभागाचा कारभार त्यानुसार चालणार आहे.

दरम्यान, देशातील दूरसंचार कंपन्या व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकसारख्या प्लॅटफॉर्मवर वापरकर्त्यांना मेसेजिंग आणि कॉलिंग सेवा देऊन त्यांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी करत आहेत. या दूरसंचार कंपन्या (Telecom companies) त्यांच्या सेवा दूरसंचार सेवेअंतर्गत येत असल्याचे सांगत आहेत. अशा परिस्थितीत लोकांचा कौल आल्यानंतर हे विधेयक संसदेत मांडले जाईल.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *