मुंबई | Mumbai
यंदा ३१ ऑगस्ट ते १७ सप्टेंबर २०२३ या कालावधीत आशिया चषक २०२३ (Asia Cup 2023) स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा हायब्रिड पद्धतीने (Hybrid Method) खेळवली जाणार असून या स्पर्धेतील सुरुवातीचे सामने पाकिस्तानमध्ये आणि उर्वरित सामने श्रीलंकेत होणार आहेत. मात्र, आशिया कप २०२३ च्या अगोदर भारतीय संघाला (Indian Team) मोठा धक्का बसण्याची शक्यता असून संघातील स्टार खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार नसल्याची माहिती समोर आली आहे…
Nashik News : गोमांस घेऊन जाण्याच्या संशयातून दोघांना मारहाण; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय संघातील मुख्य खेळाडू बऱ्याच काळापासून संघाबाहेर असल्याने त्याचा फटका वेळोवेळी भारतीय संघाला बसतांना दिसत आहे. यामध्ये के.एल. राहुल, जसप्रीत बुमराह आणि श्रेयस अय्यर यांच्या नावांचा समावेश आहे. आयपीएलच्या १६ व्या हंगामातील सामन्यांवेळी के.एल. राहुल (K.L.Rahul) दुखापतग्रस्त झाला होता. त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याची संघात पुनरागमन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पंरतु, आशिया कपपर्यंत त्याच्या पुनरागमनाची फारशी शक्यता नसल्याचे बोलले जात आहे.
Mumbai Rain : पहिल्याच पावसात मुंबईची झाली तुंबई; मुख्यमंत्र्यांकडून कामांची पाहणी, म्हणाले…
दुसरीकडे भारताचा मधल्या फळीतील स्टार फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) देखील दुखापतग्रस्त असून तो अजूनही दुखापतीतून सावरलेला नाही. त्यामुळे आशिया चषक स्पर्धेतील त्याची उपस्थितीची शक्यता कमीच आहे. श्रेयस अय्यरवर एप्रिलमध्ये शस्त्रक्रिया (Surgery) झाली होती. तर त्याने नुकतेच नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये (National Cricket Academy) पाठदुखीच्या त्रासानंतर इंजेक्शन घेतले होते. यशस्वी ऑपरेशन होऊनही त्याच्या पाठीचा त्रास कमी झालेला नाही. शस्त्रक्रियेच्या वेळी श्रेयस अय्यरचा वर्ल्डकपपर्यंत पुनरागमन करण्याचा विचार होता, परंतु सध्याची परिस्थिती पाहता त्याची आशिया कपमध्ये खेळण्याची शक्यता कमीच आहे.
Mumbai Rain : मुंबईला पहिल्याच पावसाने झोडपले; जागोजागी साचले पाणी
तसेच भारताचा तेज गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) गेल्या वर्षभरापासून भारतीय संघातून बाहेर असून तो संघात पुनरागमन करण्यासाठी झपाट्याने फिट होत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जसप्रीत बुमराह आतापर्यंत ७० टक्के फिट झाला असून अशा परिस्थितीत बुमराहला आगामी काळात होणाऱ्या आयर्लंड विरूद्धच्या दौऱ्यासाठी संधी मिळाली तर त्याची आशिया चषकासाठी भारतीय संघात निवड होऊ शकते.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...
IMD कडून गुड न्यूज! मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला