Monday, November 18, 2024
Homeनंदुरबारखानदेशचा हा आदिवासी युवक ठरणार पहिला एव्हरेस्टवीर

खानदेशचा हा आदिवासी युवक ठरणार पहिला एव्हरेस्टवीर

मोलगी molgi । वार्ताहर-

जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट (Mount Everest,) सर करण्यासाठी अनिल वसावे (Anil Vasava) याची निवड (selection) करण्यात आली आहे. जळगाव येथील मूळजी जेठा शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचा विद्यार्थी असलेला अनिल वसावे हा माउंट एव्हरेस्ट मोहिमेत सहभागी होणार असून या मोहिमेला 7 एप्रिल रोजी सुरुवात होणार आहे. ही मोहिम 7 जूनपर्यंत चालणार आहे.

- Advertisement -

बोरखेडच्या ‘या’ बहुचर्चित खुन प्रकरणात दोषारोपपत्र दाखलनंदुरबार – वाका चार रस्त्यावर तिहेरी अपघात

अनिल वसावे याने आतापर्यंत आफ्रिका खंडांतील सर्वात उंच शिखर किलोमांजरो आणि युरोप खंडातील सर्वात उंच शिखर माउंट एलब्रुस या शिखरावरील मोहीमा फत्ते केल्या आहेत. तसेच अनिलने माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प मोहिमदेखील यशस्वीपणे फत्ते केली आहे. अशी कामगिरी करणारा अनिल वसावे हा पहिला आदिवासी युवक आहे. अनिलने उत्तराखंड येथे आयोजित करण्यात आलेल्या सतोपंथ मोहीम यशस्वी केली. आता अनिल हा एव्हरेस्टवीर होण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्याने अनेक विश्व विक्रम आपल्या नावे केले आहेत. अजून एक नवीन कामगिरी करून तो आपल्या देशाचे नाव जगातील सर्वात उंच शिखर सर करून एक अभिमानाची कामगिरी करणार आहे.

आर्थिक मदतीचे आवाहन

अनिल वसावेला आदिवासी विकास विभागामार्फत मदत करण्यात आली आहे. मात्र, त्याला 35 लाख रुपये एवढी मोठी रक्कम माउंट एव्हरेस्ट मोहिमेसाठी लागणार आहे. विविध कंपनी आणि संस्था यांच्याकडून तो मदतीसाठी प्रयत्न करत आहे. अनिलच्या या एव्हरेस्ट मोहिमेसाठी दानशूरांनी आर्थिक मदत करावी असे आवाहन करण्यात येत आहे. अनिलने ही एव्हरेस्ट मोहिम फत्ते केली तर तो खानदेशचा पहिला एव्हरेस्टवीर ठरणार आहे.

धुळ्याचे पारिजात व डॉ. गायत्री चव्हाण करणार ‘हा’ विश्वविक्रम

एव्हरेस्ट सर करण्याचे माझे स्वप्न आहे. हा विक्रम करणारा मी आदिवासी समाजातील प्रथम ठरणार असल्याने माझा समाज व जिल्ह्माचे नाव तसेच राज्य आणि देशाचे नावही उंचाविण्यासाठी माझी धडपड आहे. ही मदत मला कुणी उधारीने दिली, तरी स्वप्न साकारल्यानंतर ती मी कुठलेही काम करून फेडू त्यासाठी स्वत:ला गहाण ठेवण्याची माझी तयारी आहे.

-अनिल वसावे, आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक, बालाघाट, ता.अक्कलकुवा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या