Saturday, July 27, 2024
HomeनाशिकVideo : गंगापूर धरणातून यंदाचा पहिला विसर्ग सुरु, नाशिकला अजूनही जोरदार पावसाची...

Video : गंगापूर धरणातून यंदाचा पहिला विसर्ग सुरु, नाशिकला अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षाच

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

राज्याच्या अनेक भागात पावसाने थैमान घातलं आहे. जोरदार पावसामुळे अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. राज्याच्या अनेक भागातील नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील बहुतांश भागांत दमदार पावसाची (Rain) अजूनही प्रतीक्षाच आहे. मात्र त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाची संततधार सुरु असल्याने गंगापूर धरणाच्या (Gangapur Dam) पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. गंगापूर धरणातून आज दुपारी 12 वाजता 539 क्यूसेकने विसर्ग सुरु करण्यात आला आहे…

- Advertisement -

गंगापूर धरण तसेच पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरु आहे. पावसाचा जोर चांगला असल्याने गंगापुर धरणासाठ्यात वाढ होत आहे. आजमितीस गंगापूर धरणात 69 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे धरणतून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.

Udyog Rattan Award : राज्याचा पहिला ‘उद्योग रत्न’ पुरस्कार रतन टाटा यांना जाहीर!

भावली धरण 100 टक्के भरले असून त्यातून 701 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तर दारणा धरण 78 टक्के भरले असल्याने त्यातून 6569 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. नांदूरमध्यमेश्वर धरणातून सातत्याने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. सध्या या धरणामधून 3955 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. अद्यापही नाशिक जिल्ह्यातील 24 प्रकल्पापैकी 13 धरणे 50 टक्क्यांच्या खाली आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या