Thursday, March 13, 2025
Homeनगरपुढील आठवड्यात थोरात, विखे कारखान्यासाठी प्रारूप यादी

पुढील आठवड्यात थोरात, विखे कारखान्यासाठी प्रारूप यादी

कारखाना संलग्न सोसायटी मतदारसंघाचे ठराव प्राप्त

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्ह्यासह राज्याच्या साखर विश्वात दबदबा असणार्‍या संगमनेरच्या थोरात साखर कारखाना, लोणीच्या विखे पाटील साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय तयारीने वेग घेतला आहे. या दोन्ही कारखान्यांच्या निवडणुकीसाठी कारखाना संलग्न सोसायटी मतदारसंघाचे ठराव सहकार निवडणूक यंत्रणेकडे प्राप्त झाले आहेत. आता पुढील आठवड्यात या दोनही साखर कारखान्याच्या निवडणुकीची तयारी म्हणून प्रारूप मतदार यादी प्रसिध्द होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
दरम्यान, या दोनही साखर कारखान्यांसह राहुरीच्या तनपुरे साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार असून त्यासाठी प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले.

- Advertisement -

राज्याच्या राजकारणात प्रभाव असणार्‍या नेत्यांशी संबंधित हे साखर कारखाने असल्यामुळे नगर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात राजकीय संघर्ष पहावयास मिळणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालनंतर संगमनेर तालुक्यातील राजकीय आणि सहकार क्षेत्रातील वातावरण ढवळून निघालेले आहे. याचे पडसाद थोरात कारखान्यांच्या निवडणुकीत दिसण्याची शक्यता आहे.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे वर्चस्व असणार्‍या लोणीच्या प्रवरा साखर कारखान्याची निवडणूक याच दरम्यान होणार आहे. तसेच राहुरीचा डॉ. तनपुरे कारखानाही महत्त्वाचा असून याठिकाणी सध्या विखे यांचे वर्चस्व आहे. हे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी विखे प्रयत्न करणार आहेत. तनपुरे कारखान्याची 2016 पासून याठिकाणी निवडणूक झालेली नसल्याने यंदाची निवडणूक चुरशीची होणार असल्याचा अंदाज आहे.

या तीन कारखान्यांच्या निवडणुकीमुळे संगमनेर, राहाता आणि राहुरी तालुक्याचे सहकाराचे राजकारण तापणार आहे. दरम्यान, संगमनेर कारखान्याचे ‘ब’ वर्ग मतदार असणार्‍या कारखाना संलग्न सोसायटी मतदारसंघातून 71, विखे पाटील कारखान्याचे 45 ठराव सहकार विभागाला प्राप्त झाले आहेत. आता पुढील आठवड्यात प्रारूप मतदार यादी प्रसिध्द होणार आहे. त्यादृष्टीने हालचाली सुरू झाल्याची माहिती प्रादेशिक सहसंचालक साखर यांच्या कार्यालयाच्यावतीने देण्यात आली.

35 ते 40 दिवसांत निवडणूक कार्यक्रम
जिल्ह्यातील संगमनेर आणि लोणीच्या प्रवरानगर साखर कारखान्यासाठी पुढील आठवड्यात प्रारूप मतदार यादी प्रसिध्द होणार आहे. त्यानंतर त्यावर हरकती आणि सुनावणी होवून पुढे 25 ते 30 दिवसांत अंतिम मतदार यादी प्रसिध्द होणार आहे. याच दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी यांची नेमणूक होऊन प्रत्यक्षात निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. येणार्‍या 35 ते 40 दिवसांत प्रत्यक्षात या कारखान्यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल, असा अंदाज सहकार विभागाकडून व्यक्त करण्यात आला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...