Wednesday, April 2, 2025
Homeनगरथोरात साखर कारखान्याची 11 मे रोजी निवडणूक

थोरात साखर कारखान्याची 11 मे रोजी निवडणूक

उद्यापासून उमेदवारी अर्ज दाखल

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाचा पंचवार्षिक 2025-30 साठीचा निवडणूक कार्यक्रम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणे यांनी जाहीर केला आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार 11 मे 2025 रोजी मतदान होणार असून 12 मे रोजी मतमोजणीनंतर निकाल घोषित केला जाणार आहे. नामनिर्देशन पत्रे निवडणूक निर्णय अधिकारी संगमनेर यांच्या कार्यालयात 3 एप्रिल ते 9 एप्रिल या कालावधीत साप्ताहिक व शासकीय सुट्टीचे दिवस वगळून सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मिळणार व स्वीकारण्यात येणार आहे.

- Advertisement -

प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी 11 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता करण्यात येणार आहे. छाननीनंतर वैध नामनिर्देशन पत्रांची यादी 15 एप्रिल रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर उमेदवार 15 एप्रिल ते 29 एप्रिल या कालावधीत अर्ज मागे घेऊ शकतात. माघारीनंतर प्रत्यक्ष निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांची यादी व निवडणूक चिन्ह वाटप 2 मे रोजी करण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी संगमनेरचे उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून, तर तहसीलदार धीरज मांजरे यांची सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कारखान्याची प्रारूप मतदार यादी 25 फेब्रुवारी व अंतिम मतदार यादी 19 मार्च, 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, असे निवडणूक अधिसूचनेद्वारे कळविण्यात आले आहे.

विखे कारखान्याची निवडणूक आज जाहीर होणार
प्रवरानगर येथील पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखान्याची निवडणूक जाहीर करण्याच्या हालचाली सुरू असून ही निवडणूक आज जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : बाजार समित्यांचे सुधारित वर्गीकरण

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar राज्यात एकूण 305 कृषि उत्पन्न बाजार समित्या असून सदर बाजार समित्यांचे 625 उपबाजार आवार कार्यरत आहेत. उत्पन्नानुसार बाजार समित्यांचे अ, ब, क,...