Friday, July 5, 2024
Homeनाशिकवादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्यांवर सायबर सेलची करडी नजर; काय आहे कारण?

वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्यांवर सायबर सेलची करडी नजर; काय आहे कारण?

नाशिक। प्रतिनिधी
नाशिक व दिंडोरी लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीचा रिझल्ट (दि. ४)जाहीर होणार आहे. हा निकाल येताच, सोशल मिडीयावर काही यूजर, कार्यकर्ते, समाजकंटक जातीय तेढ, धार्मिक व राजकीय विचारधारेच्या कमेंटस्, पोस्ट टाकून कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणू शकतात. ही बाब हेरुन शहर आणि ग्रामीण पोलीसांचा सायबर सेल अलर्ट असणार आहे. जे सोशल मिडीया यूजर वादग्रस्त पोस्ट, कमेंट टाकून कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न करतील, त्या यूजर्ससह ग्रृप अॅडमिनला जबाबदार धरुन कठोर कारवाई केली जाणार आहे.

- Advertisement -

अंबड येथील वेअर हाऊसमध्ये उद्या (दि.४) सकाळी आठ वाजेपासून नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या मतदानाची मोजणी (दि. ४) होणार आहे. अतिशय अतितटीच्या या निवडणुकीच्या निकालावर अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष आहे. त्यामुळे, उत्साही राजकीय कार्यकर्ते, पदाधिकारी, कट्टर समर्थक सोशल मिडीयावर विजयासोबतच वादग्रस्त पोस्ट, मेजेस, कमेंट करुन सामाजिक स्वास्थ बिघडवू शकतात.

त्यामुळे अशा संशयित यूजर्सह व्हाटस् अॅप, त्यातील विविध ग्रृप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम व ट्विटर अकाऊंट, प्रोफाईलवर सायबर पोलीसांनी करडी नजर ठेवली आहे. जे संशयित वादग्रस्त कमेंट, पोस्ट टाकतील, फॉरवर्ड करतील, त्यांच्यावर तात्काळ अॅक्शन घेतली जाणार आहे. त्यासाठी शहर आणि ग्रामीणच्या सायबर सेलची विविध पथके कार्यरत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या