Friday, April 25, 2025
Homeजळगावएकमेकांवर आरोप करणार्‍यांनी रोजगार निर्मितीसाठी काहीच प्रयत्न केले नाही-डॉ.शिंदे

एकमेकांवर आरोप करणार्‍यांनी रोजगार निर्मितीसाठी काहीच प्रयत्न केले नाही-डॉ.शिंदे

अमळनेर । प्रतिनिधी
अमळनेर मतदारसंघातील आजी माजी आमदार यांच्यात सूतगिरणी आणि रोजगार ह्या मुद्यावरून वाद प्रतिवाद सुरू असून दोघांनी आपल्या कार्यकाळात किती उद्योगधंदे आणले याचा खुलासा करावा, म्हणजे जनतेला शाश्वत विकासाची संकल्पना समजेल असा सवाल डॉ. अनिल शिंदे यांनी केला आहे.

तालुक्यात आजी-माजी आमदारांत सूतगिरणी प्रश्नावरून वाद सुरू असून चौधरी बंधूंनी या प्रश्नांनी जनतेची दिशाभूल केली आहे. मात्र त्यांच्यावर आरोप करणारे मंत्री अनिल पाटील यांनी तालुक्यात उद्योगधंदे यावेत, रोजगार निर्मिती व्हावी म्हणून काहीही प्रयत्न केलेले नाहीत. त्यामुळे आजी माजी आमदारांच्या कथनी आणि करणीत फरक आहे. दोन्हीही जनतेची दिशाभूल करत असून एकाने जनतेला उल्लू बनवत पाच वर्ष काढली तर दुसर्‍याने फक्त रस्त्याच्या कामांवर फोकस करून शाश्वत विकासाची संकल्पना मांडली. त्यामुळे तालुक्याने नवीन पर्याय देऊन यांची पेन्शन सुरू करावी असे आवाहन डॉ.अनिल शिंदे यांनी तालुक्यातील जनतेला केले आहे. तालुक्यात नवीन उद्योगधंदे यावेत यासाठी एमआयडीसी परिसरात सोई सुविधा निर्मिती तसेच उद्योजकांना प्रोत्साहन देऊन रोजगार निर्मिती करण्यात येईल असे आश्वासन डॉ. अनिल शिंदे यांनी दिले आहे.

- Advertisement -

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दहशतवाद

Sharad Pawar: “आम्ही दहशतवाद संपवला, आता काही चिंता नाही असे सांगितले...

0
मुंबई | Mumbai पहलगाम बैसरन घाटीमध्ये पर्यटकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला जो संदेश दिला आहे, तो योग्यच आहे. अशा निर्णयात सर्वपक्षीयांनी सरकार सोबत...