Friday, June 21, 2024
HomeUncategorizedभरदिवसा व्यापाऱ्याला लुटणारे जेरबंद

भरदिवसा व्यापाऱ्याला लुटणारे जेरबंद

छत्रपती संभाजीनगर – Chhatrapati Sambhajinagar

- Advertisement -

जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Agricultural Produce Market Committee) आवागत भर्रादेवसा दुकानात घुसून व्यापाऱ्याच्या गळ्याला लावून दोन चोरट्यांनी सोन्याची अंगठी, हिऱ्याची अंगठी, सोन्याचे ब्रेसलेट आणि एक लाख रोख रक्कम असा साडेचार लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला होता. या घटनेतील दोन्ही आरोपींना सिडको पोलिसांनी (police) अवघ्या चोवीस तासांत अटक करून मुद्देमाल हस्तगत केला आहे.

ग.स.संस्थेच्या सभासदांना दिलासा तर जिल्हा बँकेला मोठा धक्का!

जाधववाडी येथील बाजार समिती आवारात व्यापारी राजेश ठक्कर यांचे दुकान आहे. दुपारी तीन वाजेच्या सुमारास दोन चोरटे ग्राहक दुकानात घुसले, त्यानंतर त्यांनी दोऱ्याचे बंडल असे सांगितले. फिर्यादी दोऱ्याचा बंडल टेबलाखालून काढत असतानाच आरोपींनी चाकू काढला आणि धाक दाखवून फिर्यादीला मारहाण केली. त्यानंतर गल्ल्यातील एक लाख पाच हजारांची रोकड, फिर्यादीकडील हिऱ्याची अंगठी, सोन्याची अंगठी, ब्रेसलेट असा एकूण चार लाख ४० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला होता. याठिकाणी चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले होते. 

पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको पोलिसांनी तांत्रिक पुरावे, खबऱ्याकडून मिळालेली माहिती या आधारे संशयित आरोपी समीर अमजद पठाण (वय २२, रा. जाधववाडी), अमरीत पालसिंग जबबिरसिंग (वय २२, रा. पद्यपुरा, कल्ला, जि. तरंगल, पंजाब) या दोघांना अटक केली. विशेष पथकाचे पोलिस उपनिरीक्षक अशोक अवचार, जमादार सुभाष शेवाळे, गणेश शिंदे, विजयानंद गवळी, दिनकर दंडवते, विशाल सोनवणे, किरण काळे यांनी ही कारवाई केली. 

- Advertisment -

ताज्या बातम्या