Friday, May 31, 2024
HomeनाशिकTrimbakeshwar News : ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी त्र्यंबकनगरीत हजारो भाविक दाखल

Trimbakeshwar News : ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी त्र्यंबकनगरीत हजारो भाविक दाखल

त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी | Trimbakeshwar

उद्या तिसरा श्रावण सोमवार असल्याने त्र्यंबकेश्वरमध्ये (Trimbakeshwar) ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी हजारो भाविक (Devotee) दाखल झाले आहेत. आज रविवार (दि.०३) रोजी दुपारनंतर त्र्यंबकमध्ये भाविक दाखल होण्यास प्रारंभ झाला. त्यामुळे बम बम भोलेच्या जयघोषाने त्र्यंबकनगरी गजबजून गेली आहे…

- Advertisement -

पुण्यभूमी असलेल्या त्र्यंबकनगरीतील ब्रह्मगिरीला (Brahmagiri) सातशे वर्षांपूर्वी संत निवृत्तीनाथ महाराजांनी भावंडांसह प्रदक्षिणा केली. गुरु गहिनीनाथांनी प्रदक्षिणेच्या मार्गात संत निवृत्तीनाथांना अनुग्रह दिला. त्यानंतर अजून पुढे भागवत धर्म आणि कालांतराने वारकरी संप्रदाय वाढला. त्यामुळे निसर्गरम्य वातावरणात त्र्यंबकेश्वरची प्रदक्षिणा करण्याची परंपरा दिवसेंदिवस वाढत असल्याने या प्रदक्षिणेसाठी भाविक त्र्यंबकनगरीत दाखल झाले आहेत.

Nashik News : गजरा उद्योग समूहाचे संचालक हेमंत पारख यांचे अपहरण

गेल्या सात दिवसांपासून त्र्यंबकेश्वरला पाऊस (Rain) झालेला नाही. त्यामुळे वरुण राजाची अवकृपा जाणवली. असे असतानाही आज दुपारी चार वाजेच्या सुमारास पावसाच्या मध्य सरी कोसळल्याने पाऊस येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे भाविकांना प्रदक्षिणा करतांना प्रदक्षिणा मार्गावर पाऊस सुरू असला तर निसर्ग चैतन्य जाणवते.

दुसरीकडे ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणेला रविवारी रात्री १२ वाजेनंतर सुरुवात होत असल्याने आणखी काही भाविक त्र्यंबकनगरीत दाखल होण्याची शक्यता आहे. तसेच प्रदक्षिणा मार्गासह इतर कोणत्याही ठिकाणी कुठलीही अनुचित घटना घडून नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ६०० पोलिसांचा (Police) बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच प्रदक्षिणा मार्गावर त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयांतर्गत कोजुली, नमस्कारवाडी, सापगाव फाटा, त्र्यंबकेश्वर मंदिर व उपजिल्हा रुग्णालय या पाच ठिकाणी वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली आहेत.

Sinnar Crime News : भेसळयुक्त दूध बनवणाऱ्या डेअरीचा पर्दाफाश; लाखोंचा साठा हस्तगत

तर त्र्यंबक नगरपरिषदेकडून (Trimbak Municipal Council) मुख्याधिकारी श्रिया देवचके यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता आणि इतर सुविधांवर भर देण्यात आला आहे. तसेच त्र्यंबकमध्ये खाजगी वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला असून भाविकांची कुठलीही गैरसोय होऊ नये म्हणून जादा एसटी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Nashik Road News : बनावट गुटखा बनविणारा कारखाना उद्ध्वस्त

- Advertisment -

ताज्या बातम्या