Monday, January 26, 2026
Homeक्राईमशिक्षकांच्या पगार पत्रकावर खोट्या सह्या दाखवूण लाटले हजारो रुपये

शिक्षकांच्या पगार पत्रकावर खोट्या सह्या दाखवूण लाटले हजारो रुपये

चाळीसगाव | मनोहर कांडेकर

शहरातील महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या सचिव व मुख्याध्यापकासह क्लर्कने संस्थेच्याच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व शासनाची फसवणूक करुन एकूण १५ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांची फसवणूक करून ९७ लाख रुपये लाटण्याचे प्रकरण ताजे असताना, आता पुन्हा याच संस्थेत एक शिक्षक नेमणुकीस नसतांना सुध्दा त्यांची संस्थेत नेमणुक दाखवुन त्याच्या नावावर पगार दाखवुन पगार पत्रकावर बनावट सही करुन मॉर्डन क्रो ऑप. बँकेत पगार दाखवुन ३७ हजार रुपये लाटण्यात आले.

- Advertisement -

तसेच मयत झालेल्या व्यक्तीची सुध्दा संस्थेत नेमणुक दाखवुन विदयापीठ व शासनाची फसवणुक केल्याचे प्रकरण माहिती आधिकारात उघड झाले आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला संस्थेचा सचिव अशोक हरी खलाणे रा.नेताजी चौक, चाळीसगाव जि. जळगाव याचे व इतर संबधितांना विरुध्दात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

YouTube video player

विशेष म्हणजे अशोक हरी खलाणेवर १५ दिवसात दुसर्‍यांदा फसवणूकीचा गुन्हा दाखल झाल्यामुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. तर या संस्थेच गेल्या कित्येक दिवसांपासून भोंगळ कारभार सुरु असल्याचे जवळपास सिध्द झाले असून अशोक हरी खलाणे यांच्या सर्व संस्थेची मान्यता रद्द का करण्यात येवू नये? असा प्रश्‍न उपस्थित केला असून तशी मागणी आता शिक्षणप्रेमीकडून करण्यात येत आहे.

चाळीसगाव तालुक्यात शिक्षण क्षेत्रात सुरु असलेल्या भोंगळ कारभाराची आता शिक्षण मंत्र्यांनीच दखल घेवून उच्चस्तरीय चौकशीसाठी समिती नेमावी अशी मागणी देखील होवू लागली आहे.

ताज्या बातम्या

Crime News : बंद बंगला फोडून सोन्या चांदीचे दागिने लंपास

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar शहरातील महाराज हॉटेल पाठीमागील अर्बन बँक कॉलनी परिसरात चोरीची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी एका बंद बंगल्याचे कडीकोंडा तोडून आत प्रवेश करत...