Sunday, July 26, 2026
Homeदेश विदेशUS-Iran Conflict: मोठी बातमी! जागतिक तेलवाहतुकीला धोका; होर्मुझ सामुद्रधुनीबाबत इराणची कठोर भुमिका,...

US-Iran Conflict: मोठी बातमी! जागतिक तेलवाहतुकीला धोका; होर्मुझ सामुद्रधुनीबाबत इराणची कठोर भुमिका, नेमकी काय घडामोड घडली?

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
पश्चिम आशियामध्ये वाढत चाललेल्या तणावाचा परिणाम आता जागतिक अर्थव्यवस्थेवर उमटताना दिसत आहे. अमेरिका इराण आणि इस्रायलमधील संघर्ष तीव्र होत असताना जगभरासह भारतासाठीही ही परिस्थिती चिंतेत वाढ करणारी आहे. मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.

इराणच्या रिवोल्यूशनरी गार्ड्सनी एक मोठी घोषणा केलीय. त्यांनी सांगितले की होर्मुझची सामुद्रधुनी जहाजांसाठी बंद करण्यात आली आहे. इराणच्या सरकारी माध्यमांनी वृत्त दिले आहे की, त्यातून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही जहाजाला आग लावली जाईल.

- Advertisement -

इराणने शनिवारी जहाजांसाठी हा निर्यात मार्ग बंद करत असल्याचे सांगताना हा थेट इशारा दिला आहे. या निर्णयामुळे जागतिक तेल पुरवठ्याचा पाचवा हिस्सा विस्कळीत होण्याची भीती निर्माण झाली असून, यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

“सामुद्रधुनी (होर्मुझ) बंद करण्यात आली आहे. जर कोणी येथून जाण्याचा प्रयत्न केला, रिव्होल्युशनरी गार्ड्सचे हिरो आणि नौदल त्या जहाजांना आग लावतील,” असे गार्ड्स कमांडर इन चिफचे वरिष्ठ सल्लागार इब्राहिम जाबरी स्थानिक माध्यमांशी बोलताना म्हणाले.

२८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या संयुक्त हल्ल्यांनंतर हा मार्ग बंद करण्यात आला आहे. इराणवर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांनी देखील अमेरिकन लष्कराचे तळ असलेल्या मध्यपूर्वेतील देशांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र डागण्यास सुरूवात केली आहे. इराणकडून कतार, कुवेत आणि बहरीन अशा देशांवर हल्ले केले जात आहेत. याबरोबरच युएई, सौदी अरेबिया आणि ओमान या देशांवर देखील इराणने क्षेपणास्त्रे डागली आहेत.

काय आहे होर्मुझची सामुद्रधुनी?
इस्लामिक रिपब्लिकवर कोणताही हल्ला झाला तर त्याला प्रत्युत्तर म्हणून हा अत्यंत महत्त्वाचा जलमार्ग बंद केला जाईल, ही अनेक वर्षांपासून दिली जाणारी धमकी अखेर इराणने सत्यात उतरवली आहे. हा पर्शियन आखातातील एक अरुंद मार्ग आहे, ज्यामधून जगातील सुमारे पाचवा भाग तेल जातो. सौदी अरेबिया, कुवेत, इराक, कतार, बहरीन, युएई आणि स्वतः इराणमधील तेल आणि वायूची जहाजे जातात. यातील बहुतेक पुरवठा आशियासाठी, विशेषतः चीनसाठी केला जातो. ही सामुद्रधुनी त्याच्या सर्वात अरुंद बिंदूवर अंदाजे ३३ किलोमीटर रुंद आहे आणि पर्शियन आखाताला ओमानच्या आखाताशी जोडते. इराण आणि ओमान येथील पाण्यावर नियंत्रण ठेवतात, परंतु हा एक आंतरराष्ट्रीय जलमार्ग मानला जातो, जिथून जहाजांना जाण्याचा अधिकार आहे. दुबईसारखी ठिकाणे त्याच्या अगदी बाहेर आहेत.

दरम्यान इराण आणि त्यांचे जुने शत्रू असलेले अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील संघर्षाकडे तेल बाजाराचे लक्ष लागले आहे. हा संघर्ष आणखी तीव्र झाल्यास तेल पुरवठा विस्कळीत होऊ शकतो आणि यामुळे या प्रदेश अस्थिर होऊ शकतो.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Bhandardara : निळवंडेही ओव्हरफ्लो; मुळात 9541 क्युसेकने विसर्ग

0
भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara पाणलोटात आषाढ सरींचे तांडव सुरूच असून उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरणातून पाणी सोडल्यानंतर आता निळवंडे धरणही काल ओव्हरफ्लो झाले. भंडारदरातून...