Friday, April 25, 2025
Homeक्राईमफोटो व्हायरल करण्याची धमकी देत युवतीवर अत्याचार

फोटो व्हायरल करण्याची धमकी देत युवतीवर अत्याचार

पीडिताच्या फिर्यादीवरून युवकाविरूध्द गुन्हा दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

मोबाईलमध्ये काढलेले अश्लिल फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत युवतीवर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. मुळची पाटोदा (जि. बीड) तालुक्यातील व सध्या शिक्षणासाठी अहिल्यानगर शहरात राहत असलेल्या पीडित युवतीने रविवारी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

- Advertisement -

पीडितेच्या फिर्यादीवरून विजय दिलीप पोकळे (वय 22 रा. अंमळनेर ता. पाटोदा जि. बीड) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीची विजयसोबत ओळख झाल्यानंतर ते एकमेकांशी फोनवरून बोलत होते. फिर्यादी राहत असलेल्या नगर शहरातील ठिकाणी येऊन विजय याने तिच्याशी शारीरिक संबंध केले होते. त्यावेळी त्याने संबंधाचे फोटोही त्याच्या मोबाईलमध्ये काढले होते. दरम्यान, सदरचा प्रकार फिर्यादीच्या आई- वडिलांना समजल्यानंतर त्यांनी विजयच्या घरी जावून त्याला त्याच्या आई-वडिलांसमक्ष समजावून सांगितले होते.

6 ऑक्टोबर 2024 रोजी फिर्यादी तिच्या नगरमधील राहत असलेल्या ठिकाणी असताना विजय तेथे आला. त्याने त्याच्या मोबाईलमध्ये फिर्यादीसोबतचे अश्लिल फोटो व व्हिडीओ तीला दाखविले व ते व्हायरल करण्याची धमकी देत बळजबरीने शारिरीक संबंध केले. 14 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी फिर्यादी एका मुलासोबत कॉलेजवरून घरी दुचाकीवर येत असताना विजय याने फिर्यादीच्या बहिणीला व्हिडीओ कॉल करून दुसर्‍या मुलासोबत फिरत असल्याचे दाखवून बदनामी केली. फिर्यादीच्या वडिलांना मेसेज करून फिर्यादीची बदनामी केली. या सर्व प्रकारानंतर पीडिताने रविवारी तोफखाना पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी विजय पोकळे विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...