Friday, May 16, 2025
HomeUncategorizedमंत्री छगन भुजबळ यांना धमकी देणारा ताब्यात

मंत्री छगन भुजबळ यांना धमकी देणारा ताब्यात

- Advertisement -

नाशिक। प्रतिनिधी Nashik

ना. छगन भुजबळ यांना सोशल मीडियावर धमकी देत आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या संशयिताला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने बीड जिल्ह्यातील आष्टी येथून अटक केली आहे. रवींद्र यशवंत धनक (रा. साई श्रध्दा कॉलनी, पाथर्डी फाटा, नाशिक) असे संशयिताचे नाव आहे. त्याला अंबड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

अन्न व नागरि पुरवठा, ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्याविरुद्ध सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली हाेती. भुजबळ यांना धमकी देण्यासह अश्लील मेसेज करण्यात आले. याप्रकरणी २९ सप्टेंबर रोजी अंबड पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला होता.

युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांनी याप्रकरणी तांत्रिक विश्लेषणाची सूचना केली. त्यानुसार उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, अंमलदार प्रवीण वाघमारे, राम बर्डे, आप्पा पानवळ, सुक्राम पवार यांनी गोपनीय माहिती काढली. त्यानुसार संशयित रवींद्र धनक हा बीड येथील आष्टीमध्ये असल्याचे समजले.

पोलिसांनी अष्टी रोड येथे कारवाई करुन ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबूली दिली. दरम्यान, संशयित हा मूळ नाशिक येथील रहिवाशी असून त्याने मेसेज का अपलोड केले, यासंदर्भातील चौकशी सुरू आहे.

दरम्यान, ओबीसी व मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवरुन आंदोलने सुरू झाल्यापासून कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांना वारंवार धमक्या येत आहेत. सन २०२३ च्या जून महिन्यापासून चार-पाच वेळेस या स्वरुपाचे गुन्हे नोंद झाले. तर दोन-तीन गुन्ह्यांत संशयितांना अटक झाली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

राजनाथ

Rajanath Singh: ‘कागज का है लिबास चरागों का शहर है, संभल-संभल...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi ऑपरेशन सिंदूरनंतर भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह शुक्रवारी भुज एअरबेसवर पोहोचले. त्यांनी जवानांची भेट घेत त्यांचे भरभरून कौतुक केले....