Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रमी अल्लाहकडे तुमच्यासाठी दुआ करतो...; नवनीत राणांना पुन्हा धमकी

मी अल्लाहकडे तुमच्यासाठी दुआ करतो…; नवनीत राणांना पुन्हा धमकी

अमरावती | Amravati

खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्याबाबत एक महत्वाचे वृत्त समोर येत आहे. त्यांच्या घरी एक निनावी पत्र आले आहे. त्यांना एका अज्ञात हितचिंतकाकडून सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे…

- Advertisement -

राजस्थानच्या (Rajasthan) सीमेवरून काही संशयित लोक अमरावतीत (Amravati) दाखल झाले आहेत. ते तुमच्या घरीही आले आहे. म्हणून मी अल्लाहकडे तुमच्यासाठी प्रार्थना करतो की तुम्हाला काहीही होऊ नये, असे पत्रात म्हटले आहे. या पत्रामुळे (Letter) एकच खळबळ उडाली आहे.

नाशिक जिल्हा परिषदेचे ‘असे’ आहे गट आरक्षण; वाचा सविस्तर

असे आहे पत्र

मी तुम्हाला माझे नाव सांगू शकत नाही. मी तुमच्या शहरातील एक नागरिक आहे. मी तुम्हाल सतर्क राहण्याचे आवाहन करत आहे. कारण काही लोक तुमचा पाठलाग करत आहेत. मी एक सरकारी कर्मचारी आहे. तुम्ही माझ्या अनेक कामांमध्ये मला मदत केली आहे.

तुम्ही माझी बदली करण्यात मदत केली होती आणि माझ्या वडिलांना करोना झाला त्यावेळी खुप मदत केली. राजस्थान बॉर्डरहून काही संशयित अमरावतीत दाखल झाले आहेत. हे संशयित तुमच्या घराबाहेरही येऊन गेले असल्याची मला माहिती मिळाली आहे. मी हीच प्रार्थना करतो की तुमच्यासोबत काही अघटित घडू नये आणि तुम्ही आणखी मोठ्या पदावर जावं, असे या पत्रात म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या