शहादा Shahada । ता.प्र.-
विविध सवलतींसाठी (various discounts) महसूल, राज्य परिवहन महामंडळ व शासकीय कार्यालयांमार्फत दिल्या जाणार्या कागदपत्रांवर (documents) बनावट शिक्के मारुन शासनाची फसवणूक (Cheating the government) केल्याप्रकरणी शहादा पोलीसांनी एका जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने तिघांना 23 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहादा शहरात अनेक दिवसांपासून दिव्यांगांना महसूल, ग्रामविकास, परिवहन महामंडळाकडून देण्यात येणार्या सवलतींच्या प्रमाणपत्रांवर अवैधरितया बोगस शिक्के मारुन देणारी टोळी कार्यरत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार शहादा येथील पोलीस पथकाने शहरात तपास करुन शहरातील बसस्थानक परिसरात असलेल्या एका कटलरीच्या दुकान तसेच कापडाच्या दुकानात व घरी धाडी टाकल्या. यात कापडाच्या दुकानात अनेक बनावट रबरी स्टॅम्प, खोटया पासेस आढळून आल्या आल्या.
यात अपंग, कर्णबधीर आदींचे बनावट प्रमाणपत्रदेखील आढळून आले. याठिकाणी खोटे प्रमाणपत्र, दस्तावेज तयार करुन शासनाच्या विविध सवलतींचा लाभ दिला जात होता. आतापर्यंत शेकडो जणांना या बनावट कागदपत्रांच्या आधारे लाभ दिला गेला असल्याचे सांगण्यात येत आहे. याची व्याप्ती मोेठी असण्याची शक्यता आहे. शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी स्वप्नील पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संदीप उर्फ संतोष गोरख पानपाटील, महेंद्र सिताराम वाघ व सुनिल चौधरी सर्व रा.शहादा यांच्याविरुद्ध भादंवि कलम 420, 465, 468, 471, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहादा पोलीसांनी त्यांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता दि. 23 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. महेंद्र वाघ हे आमलाड ता.तळोदा येथील जिल्हा परिषद शाळेत उपशिक्षक म्हणून कार्यरत असल्याचे समजते. तसेच सुनील चौधरी याची प्रिंटींग प्रेस आहे.