Monday, June 24, 2024
Homeनाशिकनाशिक शिक्षक मतदारसंघातून तीन उमेदवारी अर्ज दाखल

नाशिक शिक्षक मतदारसंघातून तीन उमेदवारी अर्ज दाखल

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

- Advertisement -

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक (Nashik Division Teachers Constituency Election) प्रक्रियेच्या पाचव्या दिवशी तीन उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शुक्रवार (दि.०७) रोजी शेवटचा दिवस असून आज अनेक मातब्बर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.

येत्या २६ जून रोजी नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होणार असून या निवडणुकीत (Election) आत्तापर्यंत २२ अर्ज दाखल झाले आहेत. आज गुरुवारी पाचव्या दिवशी राजेंद्र दौलत निकम,मालेगाव यांनी टीडीएफ जुनी पेन्शन संघटनेतून अर्ज दाखल केला. तसेच संगमनेर येथील दिलीप काशिनाथ डोंगरे व अहमदनगर येथील अमृतराव रामराव शिंदे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

दरम्यान, उमेदवारी अर्ज (Application for Candidacy) भरण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने किती उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करतात याकडे शिक्षक मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या