Friday, May 3, 2024
Homeनंदुरबारनदी ओलांडताना तीन चिमुकल्यांचा मृत्यू

नदी ओलांडताना तीन चिमुकल्यांचा मृत्यू

नंदूरबार l प्रतिनिधी nandurbar

धडगाव तालुक्यातील (Dhadgaon taluka) कुंडलचा मालपाडा येथे नदी (River) ओलांडताना तीन चिमुकल्यांचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, धडगाव तालुक्यातील कुंडलचा मालपाडा येथे नदी ओलांडताना तीन चिमुकल्यांचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान हे चिमुकले देवानंद नदी (Devananda river) ओलांडून दुसऱ्या पाड्यावर जात होते.

किराणा दुकानात जात असताना खोल खड्यात बुडून तिघांचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत निलेश दीलवर पाडवी ( वय 4 वर्षे), मेहेर दिलवर पाडवी (वय 5 वर्ष), पार्वती अशोक पाडवी (वय 5 वर्ष) अशी मयतांची नावे आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या