धुळे – प्रतिनिधी dhule
शहरातील मामलेदार कचेरीजवळ शॉक लागून तीन गायी मृत्यूमूखी पडल्याची घडना घडली घडली आहे. पाऊस सुरु असताना डीपीचा शॉक लागून ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान ही धोकादायक डीपी हटविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहर परिसरात पाऊस होत आहेत. त्यातच शहरात बहुतांश ठिकाणी रस्त्यावरील डीपी अपघाताला निमंत्रण देत आहेत. मामलेदार कचेरीजवळील डीपी देखील अशीच धोकेदायक ठरत आहे.
काल रात्री दहा वाजेच्या सुमारास या डीपीजवळ खाद्याच्या शोधात आलेल्या तीन गायींना शॉक लागल्याने त्या जागीच मृत्यूमुखी पडल्या. या घटनेनंतर नागरिकांनी एकच गर्दी केली होती. या डीपीला नागरिकांनी विरोध केला असून ती तातडीने हटविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या डीपीमुळे भविष्यात मोठा अनर्थ घडू शकतो, तत्पुर्वीच डीपी तेथून हटविण्यात यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.