Wednesday, July 24, 2024
HomeनाशिकNashik News : गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे तीन गाईंची सुटका; संशयित जेरबंद

Nashik News : गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे तीन गाईंची सुटका; संशयित जेरबंद

पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati

- Advertisement -

येथील पेठ फाटा परिसरात (Peth Phata Area) टेम्पोतून कत्तलीसाठी गाई घेऊन जाणारा टेम्पो गोरक्षकांनी पकडल्याने तीन गाईंना जीवदान मिळाले आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात (Panchvati Police Station) गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. सद्दाम अन्वर हुसेन पाटकरी (रा. पिंजर घाट, नाशिक) असे संशयिताचे नाव असून टेम्पो देखील जप्त करण्यात आला आहे…

Nashik Rain News : नाशकात पावसाची तुफान हजेरी; नागरिकांची उडाली तारांबळ

याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या गणेश उत्सवाची धामधूम सुरू आहे. यातच सोमवार (दि.२५) रोजी दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास हा चालक टेम्पो (क्रमांक एमएच ४३ एडी ७३८४) मध्ये तीन गाई कत्तलीसाठी (Slaughter) पेठरोडकडून वडाळा गावाकडे घेऊन जात होता. यावेळी काही गोरक्षकांना संशय आल्याने चालकास टेम्पो थांबविण्यास सांगितले. त्यावेळी चालकाने टेम्पो पळविण्याचा प्रयत्न केला.

Nashik Crime News : नाशिकरोडला वाहनांच्या तोडफोडीचे सत्र सुरूच

मात्र, गोरक्षकांनी तसेच नागरिकांच्या जमावाने त्यास पकडले. त्यांनतर या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत संशयिताला (suspect) अटक केली. गाई असलेला टेम्पो पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे. तर या गाई तपोवनातील श्री राजलक्ष्मी गोशाळेत नेण्यात आल्या असून त्यांची सांभाळण्याची जबाबदारी या गोशाळेने घेतली आहे.

Video : “आम्हाला नाही, तर तुम्हाला नाही”; थकीत वेतनासाठी निसाका कामगारांचे गांधीगिरी मार्गाने भजन आंदोलन

दरम्यान, गणेशोत्सवाचा ठिकठिकाणी बंदोबस्त असतांना देखील अशा उघडपणे कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक कशी होते? गोरक्षकांना याबाबत माहिती मिळू शकते तर प्रशासनाला का नाही असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. तसेच संशयितांवर यापूर्वी देखील दोन ते तीन पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात संशयित आरोपी व मालकांवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी गोरक्षकांनी केली आहे.

Trimbakeshwar News : ‘शेतकऱ्यांवरील संकट टळू दे’; चंद्रशेखर बावनकुळेंची त्र्यंबकराज चरणी प्रार्थना

- Advertisment -

ताज्या बातम्या