Wednesday, May 22, 2024
Homeनगरनोकरी सांभाळून थ्री-डी रांगोळी काढणारा अवलिया

नोकरी सांभाळून थ्री-डी रांगोळी काढणारा अवलिया

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

एखाद्याच्या अंगी कलागुण उपजतच असतात असे नाही. काही हौशी कलाकार आपल्या कष्टाने, सातत्याने आपल्या कलेला एका वेगळ्याच उंचीवर नेण्यास यशस्वी झाले आहे. अशा कलाकारांची संख्या तुरळक असली तरी समाजामधून मिळणार्‍या पाठबळाच्या जोरावर हे अवलिया राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या नावाचा ठसा उमटवत आहेत. श्रीरामपूर सारख्या ग्रामीण भागातील शिवाजी गायकवाड हा अवलिया सध्या सोशल मीडियावर गाजत आहे. या गुणी कलाकाराचा थ्री-डी रांगोळी, रेखाचित्रे काढण्यात हातखंडा असून त्याने काढलेली रांगोळी, रेखाचित्रे जिवंत प्रतिकृती असल्याचा भास होतो.

- Advertisement -

शिवाजी गायकवाड हा अवलिया महसूल विभागात श्रीरामपूर तहसील कार्यालयात शिपाई पदावर कार्यरत असूनही कलेची आवड असल्याने सवड काढून आपली कला जोपासत आहे. त्यासाठी शिवाजी गायकवाड यांस श्रीरामपूरचे उपविभागीय अधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील आदी अधिकारी, कर्मचार्‍यांचे पाठबळ मिळत आहे.

मध्यंतरी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले कामानिमित्त श्रीरामपूर दौर्‍यावर आले असता गायकवाड यांनी जिल्हाधिकारी भोसले यांचे हुबेहूब रेखाचित्र रेखाटून भेट दिले. नोकरी सांभाळून कला जोपासत असल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी गायकवाड यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली होती. तसेच निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचीत यांनीही गायकवाड यांच्या कलेचे कौतुक केले आहे.

नोकरी सांभाळून आवड असल्याने सवड काढून कला जोपासत आहे. याकामी कुटुंबीय, उपविभागीय अधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.

– शिवाजी गायकवाड

- Advertisment -

ताज्या बातम्या