नंदुरबार nandurbar । प्रतिनिधी
नंदुरबार-दोंडाईचा रस्त्यावरील रनाळे गावाजवळ वाहनाने धडक दिल्याने 13 वर्षीय मुलगा, शहादा-डोंगरगाव रस्त्यावर दुचाकींच्या अपघातात (different accidents) एक तसेच शहादा तालुक्यातील बहिरपूर ते मुबारकपूर येथे दोन दुचाकींच्या झालेल्या अपघातात एक असे तीन (Three died) जणांचा वेगवेगळ्या अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार तालुक्यातील रनाळे येथील प्रकाश निंबा काकडे हे दुचाकीवर (क्र.एम.एच.18 एई 3899) रोहित नरेंद्र मिस्तरी (वय 13) यास बसवून रनाळे गावाकडे घरी जात होते. यावेळी नंदुरबारकडून येणारी सुदाम सुकदेव नरोटे रा.गुम्मी ता.बुलढाणा याने त्याच्या ताब्यातील मालट्रक (क्र.एम.एच.21 बीएच 7862) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात ट्रक चालवून दुचाकीला धडक दिल्याने रोहित मिस्तरी खाली पडल्याने त्याच्या अंगावरुन ट्रक चालविल्याने रोहित याचा मृत्यू झाला. तसेच प्रकाश काकडे यांना दुखापत झाली असून दुचाकीचेही नुकसान झाले.
याबाबत नरेंद्र वसंत मिस्तरी यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात सुदाम नरोटे याच्याविरोधात भादंवि कलम 304 (अ), 279, 337, 338, 427, मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.देविदास नाईक करीत आहेत. तर शहादा तालुक्यातील वडछील येथील वासुदेव अशोक पाटील (वय 43) हे दुचाकीने (क्र.एम.एच. 39 के 3416) वडछीलकडून डोंगरगाव रस्त्याने शहादा येथे जात होते. यावेळी एका दुचाकी चालकाने त्याच्या ताब्यातील दुचाकी (क्र.एम.एच.39 एके 1147) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात वासुदेव पाटील यांच्या दुचाकीला धडक दिल्याने गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. तसेच दोन्ही दुचाकींचेही नुकसान झाले. याबाबत कल्पेश दिलीप पाटील यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात दुचाकी चालकाविरोधात भादंवि कलम 304(अ), 279, 337, 338, 427, मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.तारसिंग वळवी करीत आहेत. तसेच
दरम्यान शहादा तालुक्यातील बहिरपूर येथील संजय जयराम पवार (वय 40) हे दुचाकीने (क्र.एम.एच.39 एच 5842) बहिरपूर ते मुबारकपूर रस्त्याने जात होते. यावेळी शहादा तालुक्यातील बिलाडी येथील भरत पानीलाल पवार याने त्याच्या ताब्यातील दुचाकी (क्र.जी.जे.15 एए 125) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात दुचाकी चालवून धडक दिल्याने संजय पवार यांना दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. तसेच दुचाकीचेही नुकसान झाले.
याबाबत सुहास जयराम पवार यांच्या फिर्यादीवरुन म्हसावद पोलिस ठाण्यात भरत पवार याच्याविरोधात भादंवि कलम 304 (अ), 279, 337, 427 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.जितेंद्र पाडवी करीत आहेत.